অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सेंद्रिय शेतीची गाथा वर्धा

सेंद्रिय शेतीची गाथा वर्धा

शेतक-याचे नाव :  श्री. अरूणराव बाळकृष्ण पेटकर
वय :  55 वर्षे
रा. लोणी, पो. आगरगांव, ता. देवळी , जिल्हा, वर्धा.

प्रस्‍तावना

लोणी या गावची कुटूंब संख्या 220 असून लोकसंख्या 1270 आहे. लोणी मध्ये जास्तीत जास्त शेतकरी कुटूंब आहेत. श्री. अरूणराव पेटकर सुध्दा लोणी या गावचे रहीवासी असून अरूणरांवाकडे स्वमालकीची 10 एकर शेती धोनापूर शिवारात आहे. अरूणरावांच्या 10 एकरामध्येही ओलीताची सोय आहे. शेतामध्ये बोअरवेल 2009 मध्ये करण्यात आली. बोअरवेलला भरपूर पाणी असल्यामूळे अरूणरावांची संपूर्ण शेती ओलीताखाली आहे. तसे अरूणराव सेलू येथील पहिले रहिवाशी आहेत. परंतु काही घरगुती कारणामुळे ते लोणीला आले आणि 2007 मध्ये लोणीला शेती घेवुन स्थाईक झाले. अरूणरांवाचे कुटूंब तस छोटेच अरूणरावांना 3 मुल आहे. त्यापैकी मोठा मुलगा M.Sc. Agri  करीत आहे. दुसरा नबंर इंजिनिअरींगला धामणगांवला आहे लहान मुलगा एस.एस.सी. नापास झाला त्यामुळे तो शेती पाहत आहे. तषी अरूणरावांना लहानपणापासूनच शेतीची आवड आहे. अरूणरावांच शिक्षण एस.एस.सी. पर्यंतच झाले आहे. पूढे ते शिकू शकले नाही. त्यांच्याजवळ 10 एकर शेती आहे. 2007 मध्ये त्यांची शेती संपूर्ण रासायनिक होती. त्यामध्ये रासायनिक खते आणि किटकनाशकानं वर त्यांचा भरपूर खर्च होत होता. कंपनीचे एजंट आणि कृषि केंद्राचे लोक त्यांना रासायनिक खते आणि किटकनाशकांचे औषध दयायचेे. त्यामध्ये त्यांना इतरांनपेक्षा थोडेफार जास्त उत्पन्न मिळायचे. परंतु रासायनिक खते आणि किटकनाशंकांचा खर्च एवढा असायचा शेतीमध्ये झालेले उत्पन्न त्यांना दयावे लागत असे. पुढील वर्षी शेतीला लावायला पैसा नसायचा अशामुळे त्यांच्या परिस्थितीत बदल होत नव्हता. मुलांच्या शिक्षणाकरीता बाहेरून पैसा आणावा लागत होता.

एक प्रयोगशिल शेतकरी - वाटचाल

एकेदिवशी श्री. सुभाष पाळेकर यांचे सेंद्रिय शेतीवर एप्रिल 2008 ला सेलू येथे प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेतला. तसेच सेंद्रिय शेती करणार्‍या शेतकर्‍यांचे मनोगत ऐकले त्यांच्या चेहर्‍यावर एक वेगळे समाधान दिसत होते. त्या शेतकर्‍यासोबत त्यांनी चर्चा केली. गावी आल्यानंतर त्यांनी त्यांच्या पत्नीसोबत शिबीराबद्दल चर्चा केली आणि तीसुध्दा प्रेरित झाली. आणि त्यानंतर त्या दोघांनी ठरविले कि आजपासून आपण सेंद्रिय शेतीच करायचे. 2008 मध्ये 5 एकर शेती सेंद्रिय पध्दतीने केली. त्यामध्ये 3 एकर सोयाबीन आणि 2 एकरात कपास पेरले त्या बियान्यांना बिजामृत, जिवामृत दशपर्णीअर्क यांचा वापर करून शेती करीत आहे. जून 2008 पासून ते सेंद्रिय पध्दतीने शेती करीत आहेत. सोयाबीन एकरी 5 ते 6 क्विटंल व कपाशी 4 ते 5 क्विन्टंल होत आहे. इतर शेतकर्‍यांच्या तुलनेत एकरी उत्पादन जरी कमी होत असले तरी माझां उत्पादन खर्च जवळपास नाहीच्या बरोबरीत आहे. त्यामुळे मी पूर्णपणे समाधानी आहे. मायावर कुठलेही कर्ज नाही त्यामुळे मी खुष आहे.

आज माझ्या जवळ 5 एकर मध्ये उस सेंद्रिय पध्दतीने आहे. त्यामध्ये आंतरपीक म्हणून टरबुजची लागवड केली होती परंतु वादळी गारपीट झाल्यामुळे टरबुज पासून उत्पन्न मिळाले नाही. परंतु मी पहिल्यांदा घेतलेल्या उसाची इतर शेतकर्‍यांनपेक्षा वाढ चांगली आहे. त्यामुळे मला उसापासून नक्कीच भरपूर पैसे मिळणार आहे. कारण त्याला उत्पादन खर्च नाहीच्या बरोबरीतच आहे.

 

आशय लेखक : वॉटर - सिड, वर्धा

अंतिम सुधारित : 1/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate