मी धोंडू भाऊ लोहकरे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील वांजुळशेत या गावचा रहिवासी असून मी खडकी बु! या गावी वॉटर संस्थेमार्फत दिलेले गांडूळ बेड बघितले व त्या बेड मध्ये तयार झालेले गांडूळ खात बघितले व ते खत खूप छान पद्धतीने बनलेले होते ते पाहून मला वाटले कि आपण सुद्धा वॉटर संस्थेमार्फत एक गांडूळ बेड विकत ध्यावे व गांडूळ खत तयार करावे.
वॉटर संस्थेने वांजुळशेत या गावात दहा गांडूळ बेड विकत दिले. यामध्ये मी एक गांडूळ बेड विकत घेतला व त्यामध्ये कुजलेला कडी कचरा व वाळलेला शेण खत टाकले. त्यानंतर पूर्ण पाण्याने भिजवून त्यातील असलेली उष्णता व गरमी काढून ते थंड केले. नंतर त्यात गांडूळ सोडले. ते गांडूळ त्यातील कडी कचरा खाऊन त्याचे खत करू लागले. मी त्या बेड मधील गांडूळ मरु नये म्हणून मी बेड वरती बांबू यांची सावली केली.
नंतर बेडमध्ये रोज ओलावा म्हणून पाणी शिंपडू लागलो व गांडूळ बेड च्या उजव्या बाजूला असलेल्या पाईपमधून गांडूळ पाणी येत होते व ते मी रोज साठवून ठेवत असे. ते खत गहू, हरभरा, टोमाटो, कांदा इतर सर्व पिकांवर फवारणी द्वारे त्या गांडूळ पाण्याचा वापर करू लागलो. गांडूळ खतांचा वापर अतिशय चांगल्या प्रकारे शेतामध्ये होतो. जमीन सुपीक होत जाते. त्यामुळे रासायनिक खते वापर न करता आपण गांडूळ खत म्हणजे सेंद्रिय खत व जमिनीची होणारी नापीकपणा ण होता जमीन चांगली राहू शकते.
आपण सर्व शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला नक्की फायदा झाल्या शिवाय राहणार नाही आणि गांडूळ खत तयार करण्यासठी अतिशय कमी खर्च होतो. म्हणजे लागणारा कच्चा माल आपल्या जवळ कडी कचरा , वाळलेले शेण खत सर्व आपल्याला आपल्या शेतात आहे. म्हणून आपण सर्व गांडूळ खात तयार करून त्याचा वापर आपल्या शेतात करावा.
माहितीदाता – सोमनाथ वाळेकर
अंतिम सुधारित : 4/23/2020
ही गोष्ट आहे अकोल्याच्या ज्योतीताईंची...! अकोला जि...
सांगली जिल्ह्यातील कासेगाव (ता. वाळवा) येथील संपतर...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे ...