अमेरिकेतील आर्कान्सास विद्यापीठामध्ये शाश्वत स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी सातत्याने प्रयोग केले जातात. या प्रयोगामध्येही परिसरातील शेतकऱ्यांचे प्रात्यक्षिक, प्रशिक्षण आणि कार्यशाळांचे आयोजन केले जाते. प्रत्यक्ष प्रयोगामध्ये शेतकऱ्यांचा समावेश असल्याने, शेतकऱ्यांमध्ये नव्या पद्धतीचा अवलंब वाढत आहे.
आर्कान्सास प्रांतामध्ये स्ट्रॉबेरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामध्ये लागवडीसह काढणीपर्यंत विविध टप्प्यांवर केल्या जाणाऱ्या प्रक्रिया आणि पद्धतीमध्ये अधिक शाश्वत सुधारणा करण्याच्या हेतूने आर्कान्सास विद्यापीठामध्ये स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी विविध लागवड पद्धतींच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यासाठी अधिक उंचीचे टनेल, कमी उंचीचे टनेल आणि प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर करून हंगाम अधिक काळ वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. या पद्धतीमध्ये स्ट्रॉबेरीची लवकर लागवड करून अधिक व दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे आर्कान्सास विद्यापीठातील फळबाग व विस्तारतज्ज्ञ लिओनार्ड गिथिन्जी यांनी सांगितले. या प्रयोगातून उपलब्ध होत असलेली माहिती शेतकऱ्यापर्यंत पोचविण्यासाठी आर्कान्सास विद्यापीठ तत्पर असून, अनेक वेळा प्रयोगामध्येही शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, कार्यशाळा यांचा समावेश केला जातो. त्यामुळे प्रत्यक्ष प्रयोगातून शिकण्याची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध होते.
स्ट्रॉबेरी उत्पादन आणि काढणीपश्चात तंत्रज्ञान यांमधील विविध विषयांवर प्रात्यक्षिकासह प्रशिक्षणाचेही आयोजन करण्यात येते. त्याचबरोबर शाश्वत उत्पादनासाठी शेतकरी आणि फळबागकर्त्या उद्योजकांसाठी कार्यशाळा, प्रक्षेत्र भेटी यांचे आयोजन करण्यात आले होते.
------------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे ...
ही गोष्ट आहे अकोल्याच्या ज्योतीताईंची...! अकोला जि...
सांगली जिल्ह्यातील कासेगाव (ता. वाळवा) येथील संपतर...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...