बिहारमध्ये अळिंबी शेतीलाही मोठी चालना मिळाली आहे. आता अळिंबी उत्पादकांना योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी तेथील कृषी विभागाचे प्रयत्न आहेत. नालंदा जिल्ह्यातील अळिंबी ही आंतरराष्ट्रीय दर्जाची असल्याचा दावा केला जातो. फ्रान्स देशातील इकोसर्ट या सेंद्रिय प्रमाणीकरण करणाऱ्या संस्थेच्या भारतीय कंपनीतील सेंद्रिय प्रमाणीकरण अधिकारी अभिषेक कुमार म्हणाले, की गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून आम्ही बिहारातील अळिंबी शेतीवर देखरेख ठेवली आहे. ही अळिंबी आंतरराष्ट्रीय दर्जाची असल्याचे आम्हाला त्यातून आढळले असल्याचे ते म्हणाले. अलीकडेच बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतातून विशेषतः बिहारातून अळिंबीचे उत्पादन घेण्याविषयी रस दाखवला आहे. बिहारचे कृषी विभागाचे आयुक्त अशोककुमार सिन्हा यांनी राज्यातील महिला अळिंबी उत्पादकांची प्रसंशा केली. त्यांच्या खडतर परिश्रमामुळेच बिहारात अळिंबी उत्पादनाला चालना मिळाल्याचे ते म्हणाले.
अळिंबी बियाणे उत्पादन प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्तावही राज्याने दिला आहे. येथील शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध होण्याचीच समस्या मांडण्यात आली आहे. सध्या रांची येथील बिरसा कृषी विद्यापीठातून तसेच बिहार राज्याबाहेरून बियाणे उपलब्ध केले जात आहे. बियाणे उत्पादन राज्यात सुरू झाले, तर आमच्याकडे अळिंबी शेतीला अधिक गती मिळेल, असे बिहार कृषी व्यवस्थापन आणि विस्तार प्रशिक्षण संस्थेचे संचालक आर. के. सोहने यांनी सांगितले. सध्या अनेक गावकऱ्यांना बियाणे महाग दराने बाहेरून आणावे लागत असल्याचेही एका तज्ज्ञाने सांगितले.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
नैसर्गिक आपत्तीने अनेक वेळा दस्तक दिल्यानंतर आता र...
पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे ...
ही गोष्ट आहे अकोल्याच्या ज्योतीताईंची...! अकोला जि...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...