कोरवली (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथील श्रीकांत गौरीशंकर राजमाने या तरुण शेतकऱ्याने डाळिंबामध्ये झेंडू फुलाचे आंतरपीक घेतले असून, आर्थिक फायद्यासोबतच डाळिंबातील सूत्रकृमींच्या प्रतिबंधासाठी प्रयत्न केले आहेत.
मोहोळ- विजापूर महामार्गावर कोरवली (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथे श्रीकांत गौरीशंकर राजमाने यांची 20 एकर वडिलोपार्जित शेती आहे. त्यामध्ये 12 एकर ऊस, 4 एकर डाळिंब आणि 4 एकर चारा पिकाची लागवड आहे. गौरीशंकर राजमाने हे जिल्हा बॅंकेत सचिवपदी कार्यरत होते, त्यामुळे नोकरीतून शेतीकडे लक्ष देणे शक्य होत नसे. शेतीमध्ये केवळ ज्वारी, गहू यासारखी पिके ते घेत असत. तसेच, भाऊ श्रीनिवास शिक्षक आहेत. श्रीकांत याने पदवी घेतल्यानंतर 2008 च्या सुमारास शेतीकडे लक्ष देण्यास सुरवात केली. ऊस पीक घेण्यास सुरवात केली. उसाचे एकरी टनेज वाढवण्यासाठी प्रयत्न केला. शेतात जुन्या दोन विहिरी असल्या तरी पाणी कमी पडत होते, त्यामुळे गावाशेजारी असलेल्या उजनी कालव्यालगत एक एकर जमीन खरेदी केली. तिथे बोअर घेऊन, त्याचे पाणी पाइपलाइनद्वारे शेतात आणले. त्यानंतर पहिल्याच वर्षी उसाचे एकरी 80 टन उत्पादन मिळवले. पुढे दोन- तीन वर्षे त्यांनी उसाचे चांगले उत्पादन घेतले. हराळवाडी येथील शेतकरी गोपाळ शेळके यांच्या सल्ल्यानुसार डाळिंबाच्या लागवडीचा निर्णय घेतला. वडील गौरीशंकर आणि भाऊ श्रीनिवास यांनीही पाठिंबा दिला. नवीन पिकाकडे वळताना माहिती मिळविण्यासाठी अन्य शेतकऱ्यांच्या डाळिंब बागांना भेटी दिल्या.
2013 च्या ऑक्टोबरमध्ये भगवा वाणाच्या डाळिंबाची लागवड चार एकर क्षेत्रावर केली. त्यात दोन ओळींतील अंतर 11 फूट आणि दोन रोपांतील अंतर 7 फूट ठेवले.
डाळिंब झाडांच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेमध्ये आंतरपीक घेण्याचा विचार केला. आता वडील निवृत्त झाले असून, तेही शेतात मदतीला येतात.
ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पहिली तोड झाली. दुसऱ्या तोडीत सप्टेंबरमध्ये एकरी अडीच टन फुले निघाली. त्या वेळी गणेशोत्सव आणि दसऱ्यामुळे फुलांना चांगली मागणी होती. आतापर्यंत सहा तोडे झाले असून, 8 टन 940 किलो उत्पादन निघाले आहे. फुलांची विक्री सोलापूर येथील बाजार समितीत सरासरी 50 रुपये किलोप्रमाणे झाली असून, 4 लाख 47 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.
उत्पादन खर्च - झेंडूची रोपे - 5,625 रुपये, खते - 4,000 रुपये, कीडनाशके - 3,000 रुपये, मजुरी - 20,000 रुपये असा एकूण 32,625 रुपये खर्च झाला.
डाळिंबाचा सध्या बहर धरण्यात आला आहे. झेंडू लागवडीचा डाळिंबाला फायदा होतो. झेंडूमुळे डाळिंबाच्या बागेत सूत्रकृमींना प्रतिबंध होतो. तसेच, झेंडूकडे मधमाश्या आकर्षित होतात, त्याचा फायदा डाळिंबाच्या फळधारणेसाठी होतो. शिवाय, झेंडूसाठी केलेली मशागत डाळिंबालाही फायेदशीर ठरली, त्यामुळे तण नियंत्रणाच्या खर्चातही बचत झाली.
संपर्क - श्रीकांत गौरीशंकर राजमाने, 9604553223
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
नगर जिल्ह्यातील शेरी चिखलठाण येथील सूर्यभान काकडे ...
आडसाली उसाची लागवड 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत...
उसामध्ये आंतरपीक घेतल्याने फायदा होतो. प्रामुख्यान...
ज्वारीचे पीक 110 ते 115 दिवसांत निघून गेल्यावर ज्व...