অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बदकाना होणारे रोग व आजार

रक्त हागवण

  • एक पेशीय परजीवी जंतूमुळे सर्व वयोगटातील बदकांना होणारा रोग असुन त्याचा कमी अधिक पादुर्भाव झाल्यास बरेच आर्थिक नुकसान होते. दमट हवामान या रोगाच्या प्रसारास मदत करते. रोगी पक्षांच्या विष्ठेत रोग जंतु असतात. याचा प्रसार दुषित खाद्य, पाणी तसेच लिटर मधुन होण्याची शक्‍यता असते.
  • लक्षणे : पक्षी सुस्त राहतात. त्यांना हागवण लागते व त्यामध्ये रक्‍त पडते, रोगाचे निदान विष्ठेची चाचणी केल्यावर होऊ शकते.
  • उपचार : पशुवैद्यकांच्या सल्यानुसार करावा.

अफ्लाटॉक्सीकोसीस

  • अस्परजीलस फ्लेक्स या बुरशीमुळे तयार होणाऱ्या विषारी घटकांमुळे हा विकार उद्‌भवतो. लहान पिल्यांमध्ये असे विषजन्य खाद्य खाल्यास मृत्युचे प्रमाण ८0 ते ९० टक्के पर्यंत असते.
  • लक्षणे : खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होणे, वाढ खुंटणे,पंख गळणे , लंगडणे व मृत्यु.
  • उपचार : यावर कुठलाही उपचार नसल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन पक्षांचे खाद्य ओलसर व दमट जागी ठेऊ नये. खाद्य कोरडे ठेवावे. पावसाळयात खाद्य गरम करून द्यावे. पक्षी घरातील लिटर ओले होऊ देऊ नये.

अस्परजिलोसीस

हा श्वसन संस्थेचा आजार अस्परजीलेसीस फ्युमि- गेटसनावाच्या बुरशीमुळे होतो. साधारणपणे २ आठवडयाच्या पिलांमध्ये या रोगाची लागण त्वरीत होते. हा आजारहवेच्या माध्यंमातुन सुध्दा पसरतो. लागण झालेल्या पक्षांना श्‍वास घेण्यास त्रास होतो. पक्षी रोडावतात. पक्षी त्वरीत तर काही पक्षी २ ते ३ दिवसांत मृत्युमुखी पडतात करीता पक्षीगृहाची स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे.

स्रोत- महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग

अंतिम सुधारित : 6/4/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate