गुरांमधील वंध्यत्व हे भारतातील दुग्धशेती आणि दुग्ध उद्योगाच्यात मोठ्या आर्थिक हानिचे कारण आहे. वांझ प्राण्यांना पोसणे हे एक आर्थिक ओझे असते आणि अनेक देशांमध्ये अशी जनावरे कत्तलखान्यात पाठवली जातात.
गुरांमध्ये, सुमारे १०-३० टक्के गुरे व्यंधत्व किंवा प्रजननाशी संबंधित समस्यांनी ग्रस्त असतात. चांगला प्रजनन दर गाठण्यासाठी किंवा पाडसांचा उच्च दर गाठण्यासाठी नर आणि मादी, दोघाही प्राण्यांना चांगला आहार दिला पाहिजे आणि आजारांपासून मुक्त ठेवले पाहिजे.
वंध्यत्वाची कारणे
वंध्यत्वाची कारणे अनेक आहेत आणि ती गुंतागुंतीची असू शकतात. वंध्यत्व किंवा गर्भार राहण्यास आणि पाडसाला जन्म देण्यास असमर्थता यामागे कुपोषण, जंतुसंसर्ग, जन्मजात दोष, व्यवस्थापकीय चुका आणि मादीमधील अंडाशय किंवा संप्रेरकांमधील असमतोल ही कारणे असू शकतात.
लैंगिक चक्र
गाई आणि म्हशींचे लैंगिक चक्र (ऑयस्ट्रस) १८-२१ दिवसांतून एकदा १८-२४ तासांसाठी असते. मात्र म्हशींमध्ये हे चक्र जाणवून येत नाही त्यामुळे शेतक-यांसमोर मोठी समस्या उभी राहते. शेतक-यांनी प्राण्यांचे पहाटेपासून रात्री उशीरापर्यंत ४-५ वेळा जवळून निरीक्षण करावे. कमी उष्णरता गेल्यामुळे व्यंधत्वाची पातळी वाढू शकते. चक्रामध्ये असणार्या प्राण्यांमध्ये दृश्य चिन्हे ओळखण्यासाठी बर्यापैकी कौशल्याची गरज असते. जे शेतकरी उत्तम नोंदी ठेवतात आणि प्राण्यांचे निरीक्षण करण्यात अधिक वेळ घालवतात त्यांना चांगले परिणाम प्राप्त होतात.
वंध्यत्व टाळण्यासाठी टिपा
- ऑयस्ट्रस कालावधीच्यात दरम्यान प्रजनन करावे.
- त्या प्राण्यांमध्ये ऑयस्ट्रस दिसत नाही किंवा चक्र येत नाही त्यांची तपासणी करुन त्यांच्यावर उपचार करावेत.
- पोटातील जंतांपासून संसर्गाच्या बचावासाठी व प्राण्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी ६ महिन्यांतून एकदा डिवर्मिंग करावे. नियमित डिवर्मिंगमध्ये लहानशी गुंतवणूक केल्याने दुग्धोत्पादनात मोठा फायदा होऊ शकतो.
- गुरांना उर्जा, प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्त्वांच्या पुरवण्या असणारा संतुलित आहार द्यावा. यामुळे गर्भार राहण्याचा दर, निरोगी प्रसूती, सुरक्षित जन्म, कमी जंतुसंसर्ग आणि निरोगी पाडस होणे यांत मदत होते.
- लहान मादी पाडसांची योग्य पोषण देऊन काळजी घेतल्यास त्यांना वेळेवारी पौगंडावस्था गाठता येते आणि त्यांचे वजन ही २३०-२५० कि.ग्रा. चे आदर्श प्रमाण गाठू शकते जे प्रजननासाठी आणि योग्य गर्भारपणासाठी आवश्यक असते.
- गर्भावस्थेमध्ये पुरेशा प्रमाणात हिरवा चारा खायला घातल्याने नवजात पाडसांमधील अंधपणा टाळता येतो आणि जन्मानंतर नाळ सांभाळून ठेवता येते.
- नैसर्गिक सेवेमध्ये जन्मजात दोष आणि संसर्ग टाळण्यासाठी बैलाचा प्रजनन इतिहास खूप महत्त्वाचा असतो.
- गाईंची प्रसूती स्वच्छ जागेमध्ये केल्याने गर्भाशयाचे संसर्ग मोठ्या प्रमाणात टाळता येतात.
- गर्भरोपणानंतर ६०-९० दिवसांनी प्राण्यांना गर्भारपणाच्या निश्चितीसाठी प्रशिक्षित पशुवैद्याद्वारा तपासावे.
- गर्भधारणा होते तेव्हां मादी अॅधनेस्ट्रस (नियमित ऑयस्ट्रस चक्रे न येणे) च्या कालावधीमध्ये प्रवेश करते. गाईसाठी गर्भावस्था कालावधी सुमारे २८५ दिवस तर म्हशींसाठी ३०० दिवस असतो.
- गर्भावस्थेच्या शेवटच्या टप्प्यात अनियंत्रित ताण आणि वाहतूक टाळावी.
- अधिक चांगले पोषण देण्यासाठी आणि प्रसूतीसाठी नेहमीच्या घोळक्यापासून दूर ठेवले जाऊ शकते.
- गर्भार प्राण्यांना त्यांच्या प्रसूतीपूर्वी दोन महिने त्यांचे दूध निथळू द्यावे आणि त्यांना पुरेसे पोषण व व्यायाम द्यावा. यामुळे आईचे आरोग्य सुधारण्यास, जन्माच्या वेळीच्या सामान्य वजनासह पाडसाचा जन्म होण्यास, आजाराचे प्रमाण कमी होण्यास आणि लैंगिक चक्र पुन्हा लवकर सुरु होण्यास मदत होते.
- बचतपूर्ण आणि नफादायक दुग्धशेतीसाठी दरवर्षी एक पाडस हा दर गाठण्यासाठी प्रसूतीनंतर चार महिने ते १२० दिवसांच्या आत प्रजनन सुरु करावे.
अधिक माहितीसाठी संपर्क करा:
डॉ. टी. सेंथिलकुमार, विस्तारित शिक्षण संचलनालय, तनुवास, चेन्नई- ६०००५१, तामिळनाडु,
दूरध्वनी: ०४४-२५५५१५८६, ईमेल: drtskumar@yahoo.com
स्त्रोत: वॉटर पोर्टल