दुधाळ जनावरांमध्ये कासदाह हा आजार दिसून येतो. कासदाह झाल्यानंतर गाईंची उत्पादन क्षमता कमी होते. कासदाह होऊ नये यासाठी जनावरांची आणि गोठ्याची स्वच्छता ठेवावी. पशुतज्ज्ञांकडून उपचार करावेत.
रोज 20 ते 25 लिटर दूध देणाऱ्या संकरित गाईंच्या व्यवस्थापनाकडे विशेष करून लक्ष द्यावे लागते. कारण या गाईंची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती कमी प्रमाणात असते. होल्स्टिन फ्रिजीयन आणि जर्सी या गाईंचे योग्य आहार व व्यवस्थापन नसेल तर त्या लवकर आजारांना बळी पडतात.
दुधाळ जनावरांमध्ये कासदाह आजार मोठ्या प्रमाणात आढळतो. कासदाह झाल्यानंतर गाईंची उत्पादन क्षमता कमी होते. कासदाह हा आजार जीवाणूपासून होतो. या जिवाणूच्या विविध जाती आहेत. या जिवाणूंचा प्रादुर्भाव एका सडामध्ये झाला की ती लगेच इतर सडांमध्ये होते.
1) जनावरांचे चारा खाण्याचे आणि दुधाचे प्रमाण कमी होते.
2) दुधाचा रंग बदलतो.त्यामध्ये गुठळ्या दिसतात.
3) दुधामधून रक्त व पू येण्यास सुरवात होते.
4) जनावरांची कास सुजल्यासारखी दिसते. कासेला हात लावला तर ती गार लागते.
5) दूध काढताना कास दुखते. कासेचा आकार एकदम लहान होतो.
6) सुरवातीला कासेला सूज येते. जसा जसा आजार वाढत जातो, तस तसा कासेमधील मुलायमपणा कमी होऊन कास कडक होते. अशा कासेमधून दूध तयार होण्याचे प्रमाण कमी होते.
7) कासदाह सुप्त अवस्थेत असेल तर जनावरांचे दुधाचे प्रमाण 10 ते 50 टक्क्यांपर्यंत कमी होते.
1) गोठ्याची स्वच्छता रोज ठेवावी. गोठा कोरडा ठेवल्याने जिवाणूंचा प्रादुर्भाव कमी होतो.
2) गोठ्यात हवा खेळती असावी. सूर्यकिरण आतपर्यंत येतील अशी गोठ्याची रचना असावी.
3) दूध काढणाऱ्या माणसाने आपले हात स्वच्छ साबणाने धुऊन घ्यावेत.
4) दूध काढण्यापूर्वी कासेला पोटॅशियम परमॅगनेटच्या द्रावणाने स्वच्छ करावे.
5) कास आणि सड धुतल्यावर दूध काढण्यापूर्वी व दूध काढल्यानंतर स्वच्छ कापडाने पुसून घ्यावेत.
6) दूध काढण्याचे यंत्र वापरण्यापूर्वी व वापर झाल्यानंतर स्वच्छ करावे.
7) दूध काढण्यासाठी वापरण्यात येणारी भांडी स्वच्छ असावीत.
8) दूध काढताना चारी बोटे सडावर समान दाबाने आणि अंगठा आकाशाच्या दिशेने ठेवावा.
9) दूध काढल्यानंतर गाई, म्हशीला लगेच जमिनीवर बसू देऊ नये. त्यांना हिरवा चारा खाण्यास द्यावा.
10) दूध काढण्यापूर्वी गाईला किंवा म्हशींना कोरडा खुराक द्यावा.
11) वासरू दूध पीत असेल तर कासेला किंवा सडाला जखम होणार नाही याची काळजी घ्यावी.
13) गाय, म्हैस व्यायल्यानंतर चीक लगेचच काढावा.
14) गाई, म्हशीची सुरवातीची व शेवटची धार दुधाच्या भांड्यात न घेता वेगळी काढावी.
15) जास्त दूध देणाऱ्या गाईंची धार दिवसातून ठराविक अंतराने 3 ते 4 वेळेस काढावी.
16) दुधाळ गाईचे धारा काढण्याचे रोजचे वेळापत्रक पाळावे.
17) कास किंवा सडामध्ये दूध शिल्लक राहणार नाही याची काळजी घ्यावी.
18) कासदाह झालेल्या गाई, म्हशीचे दूध शेवटी काढावे.
19)) दुधाबद्दल शंका वाटत असेल तर लगेच पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा.
संपर्क ः डॉ. पी. डी. पवार ः 9730383107
(लेखक क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा येथे कार्यरत आहेत
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
विशेषत: हवामानातील बदलामुळे नैसर्गिक आपत्तीत आकस्म...
करडांच्या शरीरस्वास्थ्य सुयोग्य राखण्यासाठी सकस आह...
थंडी संपतेवेळी येणाऱ्या आंबिया बहाराचे व्यवस्थापन ...
या वर्षीच्या कमी पावसामुळे सिंचनासाठी पाण्याची उपल...