कोंबड्यांमध्ये सर्वत्र आढळणारा आजार म्हणजेच लूज ड्रॉपिंग किंवा कोंबड्यांना पातळ संडास होणे. मुळात फारसा धोकादायक नसलेला हा आजार योग्य वेळी उपचार न केल्यास मात्र धोकादायक ठरतो.
1) खाद्यात असणारे जास्त प्रमाणातील प्रथिने अथवा इतर पौष्टिक घटक यामुळे हा आजार दिसून येतो. परंतु, याच दरम्यान कोंबड्यांना संसर्ग झाला, तर यात मोठ्या प्रमाणात मर होऊ शकते.
2) या आजारामुळे कोंबड्यांची वाढ नीट होत नाही. त्यांचे वजन भरत नाही, कोंबड्या अशक्त होतात.
3) कोंबड्यांना आजाराचा संसर्ग झाल्यास सर्वप्रथम पशुवैद्यकाद्वारे प्रतिजैविकचा वापर करावा.
1) कुडा : कुटज या नावाने ही वनस्पती ओळखली जाते. मोठ्या वृक्ष स्वरुपातील या वनस्पतीची साल औषधीमध्ये वापरली जाते. सालीची मात्रा :10-15 ग्रॅम प्रति 100 पक्षी
2) कात : खदिर या नावाने ही वनस्पती ओळखली जाते. या वनस्पतीचा निर्यास किंवा डिंक औषधीत वापरतात. तसेच झाडाची सालदेखील वापरतात. औषधीत निर्यास वापरल्यास त्याची मात्रा 01 ग्रॅम प्रती 100 पक्षी अशी द्यावी. औषधीत जर वनस्पतीची साल वापरली तर तिची मात्रा 10 ग्रॅम प्रति 100 पक्षी अशी द्यावी.
3) बाभळी : बाभूळ ही वनस्पती सर्वत्र मोठ्या प्रमाणात आढळते. या वनस्पतीचा "डिंक' औषधीत वापरतात.
मात्रा : 5-8 ग्रॅम प्रति 100 पक्षी
4) बेल : बेल फळांचा गर किंवा या वनस्पतीचे पाने औषधीत वापरतात.
मात्रा :
1) फळाच्या गराची मात्रा 5-8 ग्रॅम प्रति 100 पक्षी
2) पानांची मात्रा 10-15 ग्रॅम प्रति 100 पक्षी
5) डाळिंब : फळाची साल व बी औषधीत वापरतात. डाळिंबात जिवाणू विरोधी गुणधर्म असल्यामुळे याचा अत्यंत चांगला उपयोग होतो.
मात्रा :
1) बियांची मात्रा 15-20 ग्रॅम प्रति 100 पक्षी
2) फळाची साल वापरल्यास 20 ग्रॅम प्रति 100 पक्षी
1) कुडा - 10 ग्रॅम
2) कात - (डिंक) - 1 ग्रॅम
3) बाभळी (डिंक) - 5 ग्रॅम
4) बेल (फळ) - 6 ग्रॅम
5) डाळिंब (फळ) - 13 ग्रॅम
मात्रा : वरील घटक एकत्र करून बारीक करावेत. याची मात्रा 10-15 ग्रॅम प्रति 100 पक्षी प्रतिदिन द्यावी.
डॉ. सुधीर राजूरकर 9422175793
(लेखक औषधी व विषशास्त्र विभाग, पशुवैद्यक महाविद्यालय, परभणी येथे कार्यरत आहेत)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
आवळा तुरट, आंबट चवीचे, हिवाळ्यात येणारे हिरव्या रं...
वनस्पती औषधी व क्षुपे (झुडपे) असून त्यांचा प्रसार...
इसबगोलाचे बी शीतल, शामक, मूत्रल (लघवी साफ करणारे) ...
अडुळसा हे सदैव हिरवेगार असणारे, दोन ते तीन मीटर उं...