অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कोंबड्यांमधील ताण कमी करावा

कोंबड्यांमधील ताण कमी करावा

  1. अचानक हवामान बदलामुळे ताण येऊन रोगप्रतिकार शक्ती कमी होऊन कोंबड्या इतर रोगांना बळी पडू शकतात.
  2. एका प्रकारच्या खाद्यापेक्षा वेगळे खाद्य देणे, घरगुती आहारात पुरेशा प्रमाणात पोषक तत्त्व नसणे किंवा इतर कारणांमुळे ताण येऊन कोंबड्या पुरेसे खाद्य खात नसतील तर ताण येऊ शकतो. अशा वेळी तज्ज्ञांच्या सल्ल्यावरून ताण कमी करण्याची औषधे द्यावीत.
  3. वजन वाढणे, पिसे गळणे किंवा वयात येणे यासारख्या घटना ताण निर्माण करू शकतात.
  4. कोंबड्यांना पकडताना, काही औषधे देताना किंवा एका जागेतून दुसरीकडे नेताना कोंबड्यांमध्ये भावनिक ताण येतो.
  5. रोगनिवारणासाठी देण्यात येणाऱ्या औषधांमुळे व रोगाच्या अवधीमुळेही ताण येऊ शकतो.

उपाययोजना

  1. कोंबड्यांमधील ताण घालविण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी प्रत्येक कोंबडीला किती जागा लागते हे पाहून आपल्याजवळील जागेच्या उपलब्ध जागेत एकूण कोंबड्यांची संख्या ठरवावी.
  2. छोट्या जागेत जास्त गर्दी केल्याने वातावरणात अमोनियाचे प्रमाण वाढते. शिवाय पक्षी एकमेकांच्या जास्त जवळ असल्याने रोग आल्यास लवकर पसरतो. यावर उपाय म्हणून लिटरची स्वच्छता ठेवावी.
  3. पावसाळ्यात व जास्त आर्द्रतेच्या काळात लिटर प्रयत्नपूर्वक कोरडे ठेवावे. वातावरणातील बदलांनुसार शेडमध्ये पडदे लावणे, पोती बांधणे या गोष्टींची वेळेवर काळजी घ्यावी.
  4. ताण घालविणारी औषधे तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ल्याने द्यावीत. आहारातून किंवा पाण्यातून जीवनसत्त्वांचा पुरवठा केल्यास ताण कमी होतो. ताण असताना लसीकरण करू नये. प्रथम कोंबड्यांवरील ताण कमी करून मगच लसीकरण करावे.

 

संपर्क - क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा.

रवी मोटके, भोर, जि. पुणे

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate