मागील ५ ते ६ वर्षापासून पावसाचे प्रमाण अगदी कमी होत चालले आहे. त्यातच मागील वर्षी तर अगदी जून पासूनच समाधानकारक असा पाऊस पूर्ण महाराष्ट्रात विदर्भाचा काही भाग वगळता कोठेच झाला नाही. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात दुष्कळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतक-यांसाठी अन्नधान्य उत्पादनाबरोबरच चाप्याच्या उत्पादनावर खूप मोठे संकट आले आहे.
अशा परिस्थितीत चारा-वैरण उत्पादनासाठी योग्य नियोजन करणे पशुपालकांसाठी काळाची गरज बनली आहे. अशा दुष्काळी परिस्थितीत जर नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला तर पशुपालकांना कमी उत्पादन खर्चात जनावरांना चारा उपलब्ध करून देता येईल. यासाठी कमीतकमी जागेत, अल्पावधीत व कमी उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात हिरव्या चान्याची उपलब्धता करण्यासाठी हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाचा उपयोग करता येईल. हायड्रॉपोनिक्स तंत्रज्ञानाव्दारे चारा उत्पादन करण्यासाठी शासनाकडून राज्यात योजना राबविण्यात येत आहे.
हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान म्हणजे काय?
जवळपास सर्वच पिकांसाठी त्यांच्या वाढ़ीच्याकाळात हवा, माती व पाणी या प्रमुख माध्यमांची आवश्यकता असते. यातच माती ही पिकांच्या वाढीसाठी प्रमुख गरज आहे. परंतु हायड्रोपोनिक्स या तंत्रज्ञानात मातींशिवाय बियाण्याला योग्य तेवढ़ी आद्धता, पाणी व पिकाच्या वाढ़ीसाठी आवश्यक अन्नद्रव्य पुखून पिकाची वाढ केली जाते. माती या माध्यमाशिवाय फक्त पाण्याचा वापर करून पिकांचे उत्पादन घेणे म्हणजे हायड्रोपोनिक होय. या तंत्रज्ञानाचा वापर ऑस्ट्रेलिया तसेच अमेरिकेतही काही भागात चारा उत्पादनासाठी केला जात आहे. महाराष्ट्रात या तंत्रज्ञानाचा उपयोग चारा उत्पादनासाठी मागील दीड ते दोन वर्षापासून केला जात आहे.
या तंत्रज्ञानाद्वारे चारा उत्पादन घेण्यासाठी अत्याधुनिक वातावरण नियंत्रित शेडनेटमध्ये सुद्धा उत्पादन घेता येऊ शकते. महाराष्ट्रातील वातावरणाचा विंचार केला असता साधारण ५0 ते १0 टक्के शेडनेटचा वापर करावा. अशाप्रकारे २५ फूट (लांबी) × १0 फूट (रुंदी । × १0 फूट (उंची) या आकाराच्या शेडनेटमध्ये चान्याचे उत्पादन घेतल्यास ७ दिवसांत जवळपास ६00 ते ६५00 किं.ग्रॅ. हिरव्या चान्याचे उत्पादन आपण घेऊ शकतो. आपल्याकडील एकूण असलेल्या जनावरांना लागणा-या चान्याच्या आवश्यकतेनुसार शेडनेटहाऊसचा आकार ठेवावा व त्यासाठी लागणा-या मायक्रो स्प्रिंकलर किंवा फॉंगेर्सच्या संख्येनुसार ते चालवण्यासाठी वीजपंपाद्वारे पाण्याचा योग्य दाब ठेवणे गरजेचे आहे.
हायड्रोपोनिक्स चारा तयार करण्याची पद्धत
- हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाने प्रामुख्याने मका, गहू, बालों, ओट व बाजरी या तृणधान्यांची वाढ करून चारानिर्मिती करता येते. काही भागात चवळी किंवा इतर द्विदल पिकांचा सुद्धा वापर केला जातो. परंतु या पद्धतीद्वारे ज्वारीचा उपयोग करू नये. कारण कोवळ्या ज्वारीच्या
- ताटामध्ये हायड्रोसायनिक अॅसिड असल्यामुळे जनावरांना विषबाधा होण्याचा संभव असतो.
- यासाठी वरीलप्रमाणे बियाणे निवडताना, बियाणे चांगले व उत्तम प्रतीचे असावे. टपोरे दाणे, किंमान ८o टक्के उगवणक्षमता, रोगमुक्त व बुरशीमुक्त असावे. तसेच बियाणे कोणतीही बिजप्रक्रिया केलेले नसावे. असे केल्यामुळे जनावरांना होणा-या विषबाधेचा धोका टाळू शकतो.
- या पद्धतीत बियाणे मोड येण्यासाठी १२ ते २४ तास कोमट पाण्यात भिजत ठेवावे . १ कि.ग्रॅ बियाण्यासाठी दोन लिटर कोमट पाणी घ्यावे . यानंतर पाणी काढून ते बियाणे ओल्या बारदान्यात पुढील २४ तासांसाठी कोंबून ठेवावे. यामुळे बियाण्यास मोड येण्यास सुरुवात होते. वातावरणाच्या अंदाजानुसार बारद्धान्यावर सकाळ व संध्याकाळी पाणी शिंपडून ते सतत ओलसर ठेवावे.
- कोंब फुटण्यास सुरुवात झालेल्या बियाण्यावर ५ टक्के मिठाचे द्रावण शिंपडावे. यामुळे ओलसर असलेल्या वातावरणात वाढ्णा-या बुरशीची वाढ होत नाही. शेडमध्ये चान्याची वाढ होत असताना आवश्यकतेनुसार मिठाच्या पाण्याचा वापर करता येऊ शकतो. बुरशीच्या प्रतिबंधासाठी ट्रायकोडर्मा या जैविक बुरशींनाशकाचा वापर करता येईल.
- यानंतर ३ फूट × २ फूट × ३ इंच या आकाराचे ट्रे प्रती जनावर १o या प्रमाणे घ्यावेत. ट्रे स्वच्छ पाण्यात धुऊन चांगले वाळवून घ्यावेत. पूर्णपणे मोड आलेले तृणधान्य २ कि.ग्रॅ. प्रती ट्रे मध्ये याप्रमाणे पसरवून द्यावे व असे ट्रे शेडमध्ये लाकडाच्या किंवा बांबूच्या ताट्य़ांवर ठेवावेत.
- शेडमध्ये आढंता कायम टिकून राहावी म्हणून फॉंगेर्स किंवा मायक्रोस्ग्रींकलरचा वापर करता येतो. फॉगर्सचा वापर केल्यास दिवसातून ७ वेळेस २ तासाच्या अंतराने प्रत्येक वेळेस ५ मिनिटे याप्रमाणे पाणी द्यावे. पूर्ण २४ तास फॉगर्सचा उपयोग केल्यास वीजपंपाला टायमर्चा वापर करावा.
अशा पद्धतीने १g ते १२ दिवसात २0 ते २५ सें.मी. उंचीचा हिरवा चारा तयार होतो. त्यातून जवळपास १० ते १२ कि.ग्रॅ. हिरव्या चान्याचे उत्पादन प्रती ट्रे घेऊ शकतो. दुभत्या जनावरांना १५ ते २० कि.ग्रॅ. चारा प्रती दिवस लागतो. यानुसार आपल्याकडील असलेल्या एकूण जनावरांच्या संख्येनुसार ट्रेचे नियोजन करावे.
हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञनाद्वारे चारा उत्पादनाचे फायदे
- या तंत्राद्वारे दुष्काळी परिस्थितीत किंवा उन्हाळ्यात हिरव्या चान्याची उपलब्धता करता येते.
- कमीतकमी कालावधीत, कमी जागेत, कमी पाणी, कमी वेिजेचा वापर करून अधिक पोषणमूल्ये असलेला हिरवा चारा पिकवू शकतो.
- जनावरांच्या आहारात पशुखाद्याच्या वापराच्या खर्चाचा विचार केला असता, त्यापेक्षा कमी खर्चात जास्त प्रमाणात चारा जनावरांना देता येतो. यामुळे पशुखाद्यावरील सरासरी २५ ते ४० टक्के खर्च कमी करता येऊ शकतो व दुधाच्या प्रमाणात देखील वाढ होते.
- तयार झालेला चारा मुळासकट जनावरांना खाऊ घालता येत असल्यामुळे बहुतांश पाणी व जास्तीतजास्त अन्नद्रव्ये जनावरांना मिळतात. या पद्धतीमध्ये कोणतीही अक्षद्रव्ये वाया जात नाहीत. ह्य चारा अत्यंत लुसलुशीत, पौष्टिक व चवदार असून, त्यामध्ये प्रथिने, जीवनसत्वे, एन्झाईम्स आणि सूक्ष्म अन्नघटकांचे प्रमाण भरपूर असते.
- या चान्यात धान्याच्या तुलनेत २ ते २.५ पट अधिक प्रथिने असल्यामुळे जनावरांना तो फायदेशीर आहे. अधिक पॅट्रिकता व कोवळा चारा असल्यामुळे जनावरे आवडीने खातात.
- सुरुवातीला ट्रे चा खर्च वगळता यात खूप कमी खर्चात चारा उत्पादित करू शकतो. ३ ते ४ रुपये प्रती किंग्लोग्रॅम चारा याप्रमाणे लुंपादन ख़र्च येतों.
- हायड्रोपोनेिक्स या तंत्रज्ञानात पाण्याचा अतिशय कमी वापर होत असल्यामुळे उन्हाळ्यात, पाणीटंचाईत व दुष्काळ्सदृश परिस्थितीत या तंत्रज्ञानाचा पशुपालकांना खूप मोठा आधार होऊ शकतो.
- वर्षभर अखंडपणे हिरवा चायाचे उत्पादन घेता येत असल्यामुळे यावर वातावरणाचा विशेष फरक पडत नाही.
- पारंपरिक चारा उत्पादनाच्या तुलनेत
- खूप कमी मनुष्यबळ लागत असल्यामुळे लागवड खर्च खूप कमी होतो.
- या पद्धतीद्वारे चारा उत्पादित करताना कोणतेही खत किंवा रसायनांचा वापर होत नसल्यामुळे पूर्णपणे नैसर्गिक किंवा जैविक चारा जनावरांस मेिळतो
- पारंपरिक चान्याप्रमाणे काढणीपूर्वी आणि साठवणुकीत होणारी नासधूस व पोषणमूल्यांचा अपव्यय होत नाही. कारण रोज लागणारा चारा रोज उत्पादित केला जातो.
स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन