पुरातन काळापासून औषधी वनस्पतींचा वापर मानवी, तसेच जनावरांच्या आरोग्याच्या तक्रारींवर उपाय म्हणून केला जात आहे. औषधी वनस्पतींवरील संशोधनाचा फायदा दूध उत्पादकाला होण्यासाठी औषधी वनस्पती आधारित पशुखाद्यपूरके आम्ही विकसित केली आहेत. याचा चांगला फायदा दूध उत्पादनवाढ, जनावरांच्या आरोग्य व्यवस्थापनासाठी होत आहे.
औषधी वनस्पती आधारित पशुखाद्यपूरके विकसित करण्यापूर्वी दूध उत्पादक, पशुवैद्यक, दूध संकलन अधिकारी, कृत्रिम रेतक कर्मचारी, दूध डेअरीचे संचालक यांच्याशी चर्चा करून पशुखाद्यपूरके विकसित केली आहेत.
१. HC 1 : गाई-म्हशींच्या एका वेतातील सरासरी दूध उत्पादन वाढीसाठी, तसेच गुणवत्तेत (फॅट व एसएनएफ) सुधारणेसाठी.
२. HC 2 : गाई-म्हशी माजावर येण्यासाठी.
३. HC 3 : गाई-म्हशीच्या पान्हविण्याच्या तक्रारी निवारण करण्यासाठी.
विशेष गुणधर्म
HC 1 : गाई-म्हशींच्या एका वेतातील सरासरी दूध उत्पादन वाढीसाठी, तसेच गुणवत्तेत (फॅट व एसएनएफ) सुधारणेसाठी.
- हे पशुखाद्यपूरक केवळ मिनरल मिक्श्चर नसून वनौषधी अर्क, प्रोबायोटिक, चिलेटेड मिनरल्स, कॅल्शियम, फॉस्फरस, अमिनो ॲसिड्स इत्यादी घटकांचे मिश्रण आहे.
- या पशुखाद्यपूरकांतील वनौषधींमुळे जनावरांची मज्जासंस्था कार्यक्षम होऊन चयापचयाची क्रिया सुधारते.
- प्रोबायोटिकमुळेसुद्धा पचनशक्ती अधिक क्षमतेने होण्यास मदत होते.
- यामधील चिलेटेड मिनरल मिक्श्चरमुळे कॉपर, लोह, झिंक, मँगेनीज, कोबाल्ट, क्रोमियम, सेलेनियम आदी खनिज द्रव्ये रक्तात अधिक जास्त प्रमाणात शोषली जातात. परिणामी ,खनिजांची कमतरता भरून येऊन जनावरे वेळेवर माजावर येण्यास मदत होते. चिलेटेड मिनरल्समुळे कासदाहावर नियंत्रण राहून सोमॅटिक काउंट कमी होण्यास मदत होते.
- या पशुखाद्यपूरकाच्या चाचण्या महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात येथील मुऱ्हा, मेहसाणा, जाफराबादी, सुरती, पंढरपुरी इत्यादी सुधारित/ गावरान जातींच्या म्हशी आणि देशी/ संकरित गाईंवर अनुभवी पशुवैद्यकीय अधिकारी, पशुधन पर्यवेक्षकांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या. या राज्यांतील विविध तालुक्यांतील हवामान, पशुआहार, पशू व्यवस्थापन, विविध प्रकारची तसेच विविध वेतांतील जनावरांच्या जनुक क्षमतेनुसार दूध उत्पादनात वाढ दिसून आली.
- चाचण्यांमध्ये HC 1 प्रतिदिन ३० ग्रॅम पशुखाद्यातून जनावरांना खाऊ घातल्यानंतर जातिवंत म्हशीमध्ये सात ते पंधरा दिवसांत सरासरी एक ते दीड लिटर प्रतिदिन दूध वाढ, तसेच गावठी म्हशीमध्ये सरासरी ३०० ते ५०० मि.लि. प्रतिदिन इतकी दूधवाढ दिसून आली. संकरित गाईमध्ये सहा ते आठ दिवसांत सरासरी एक ते दोन लिटर प्रतिदिन दूधवाढ, तसेच देशी गाईंमध्ये सरासरी ७५० मि.लि. ते १.२५० लिटर प्रतिदिन इतकी दूधवाढ दिसून आली. जातिवंत/ गावठी म्हशी, तसेच संकरित/ देशी गाईमध्ये सरासरी प्रतिदिन ०.२ ते १.५ टक्के फॅट वाढ, तसेच सरासरी प्रतिदिन ०.२ ते ०.७ टक्के एस.एन.एफ. वाढ दिसून आली. गुजरातमधील गोशाळा, तसेच पांजरपोळातील गीर, कांक्रेज, डांगी इत्यादी गाईमध्येही दूधवाढीच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत.
- या पशुखाद्यपूरकामुळे वातावरणात होणाऱ्या बदलांचा व वेतांचा दूध उत्पादनावर कोणताही परिणाम होत नाही. ऐन उन्हाळ्यातसुद्धा (४५ ते ४७ अंश सेल्सिअस) गाई, म्हशींमध्ये एक ते दीड लिटर इतकी दूधवाढ, तसेच ०.५ ते दोन टक्के फॅट वाढ दिसून आली.
- हे पशुखाद्यपूरक हे औषधी वनस्पती आधारित असल्यामुळे आजतागायत जनावरांवर कोणतेही दु्ष्परिणाम दिसून आलेले नाहीत.
- याच्या नियमित वापरामुळे प्राप्त होणारे दूरगामी फायदे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाने प्रमाणित केलेले असून, दूध उत्पादक शेतकऱ्यांस वरदानच ठरले आहे.
HC 2 : गाई-म्हशी माजावर येण्यासाठी.
- खनिज द्रव्यांच्या कमतरता आणि कुपोषणामुळे जनावरांच्या माजाच्या तक्रारी दिसतात. यामुळे जनावरे भाकड होतात. भाकड जनावरांमुळे दुग्ध व्यवसाय अडचणीत येतो. या परिस्थितीवर मात करण्यासाठी HC 2 हे चिलेटेड मिनरल्सयुक्त औषधी वनस्पती आधारित पशुखाद्यपूरक विकसित करण्यात आले आहे.
- HC 2 प्रतिदिन २० ग्रॅम खाऊ घातल्यामुळे गाई आणि म्हशी त्यांच्या जनुक क्षमतेनुसार १० ते २५ दिवसांदरम्यान माजावर येतात.
- यामधील औषधी वनस्पतींच्या अंतर्भावामुळे गाई आणि म्हशीच्या गाभण राहण्यामध्ये लक्षणीय सुधारणा दिसून येते, तसेच जनावरांना अंतःस्रावाचे संतुलन राखण्यास मदत होते.
- HC 2 पशुखाद्यपूरक मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाने गाई-म्हशी माजावर येण्यासाठी प्रमाणित केले आहे.
HC 3 : गाई-म्हशीच्या पान्हविण्याच्या तक्रारी निवारण करण्यासाठी.
- शेतकरी गाई-म्हशींच्या उत्तरार्धातील गर्भावस्थेत दूध उत्पादन बंद झाल्यामुळे, दिवसेंदिवस वाढणाऱ्या खर्चामुळे पशुआहारात काटकसर करतो, त्यामुळे गर्भातील वासरांची वाढ खुंटते. काही वेळा वासरे गर्भातच मृतावस्थेत आढळतात किंवा व्याल्यानंतर काही कालावधीतच मृत्यू पावतात. दिवसेंदिवस दूध विक्रीच्या दरवाढीमुळे दूध उत्पादकांचा कल दूध विक्रीकडे असल्याने नवजात वासरांना त्यांच्या हक्काचे दूध पाजले जात नाही. त्यामुळे नवजात वासरांची वाढ खुंटते.
- गाई-म्हशी व्याल्यानंतर, वासरांपासून दुरावल्यामुळे, अतिप्रवासाच्या तणाव, नेहमीच्या जागेत बदल, तसेच नेहमी दूध काढणाऱ्या व्यक्तीत बदल आणि वातावरणातील बदलामुळे जनावरांच्या पान्हविण्याच्या तक्रारी दिसतात.
- परिणामी, गाई-म्हशी पान्हा सोडत नाहीत.
- पान्हा सोडणासाठी इंग्रजी औषधांचा दुष्परिणाम माहिती असूनसुद्धा नाइलाजास्तव वापर केला जातो. या औषधांमुळे जनावरांच्या गाभण तक्रारी, तसेच वारंवार होणारा गर्भपात या समस्या उद्भवतात.
- या समस्या लक्षात घेऊन गाई-म्हशीच्या पान्हविण्याच्या तक्रारीसाठी HC 3 हे औषधी वनस्पती आधारित पशुखाद्यपूरक विकसित केले आहे.
- धार काढण्याअगोदर अर्धा तास सकाळ व संध्याकाळ HC 3 हे पशुखाद्यपूरक ५० ग्रॅम पशुखाद्यातून दिल्यास गाई-म्हशी वेळेत पान्हा सोडतात. यामधील औषधी वनस्पतींच्या अंतर्भावामुळे सरासरी प्रतिदिन ३०० ते ५०० मि.लि. दूधवाढ दिसून येते. HC 3 मुळे गाई-म्हशीचा वार लवकर पडून वेळेवर माजात येतात.
या पशुखाद्यपूरकांच्या स्वामित्वासाठी अध्यादेश (ग्रांट ऑफ पेटेंट) अमेरिकन स्वामित्व (पेटेंट) कार्यालयाने नुकताच जारी केला आहे. पशुखाद्यपूरकांची उपयुक्तता अल्पभूधारक शेतकरी व भूमिहीन शेतमजूर यांच्या गोठ्यात, तसेच सहकारी दूध संघ व खासगी दूध डेअरी यांच्या माध्यमातून सिद्ध झाली आहे. या पशुखाद्यपूरकांचे वितरण सहकारी दूध संघ, खासगी दूध डेअरी, सेवाभावी विश्वस्त संस्था इत्यादींच्या माध्यमातून झाले तर दूध उत्पादक शेतकऱ्यांस पशुखाद्यपूरके किफायतशीर दरात उपलब्ध होतील, तसेच सद्यःस्थितीतील दुग्ध व्यवसाय शाश्वत होण्यास मदत होईल.
टीप: HC 1 : Phytolactin TM (फायटोलॅक्टिन).,
HC 2 : comFert(R) (कम्फर्ट) आणि
HC 3 : LDP (R) (एलडीपी)
या व्यापारी नावाअंतर्गत (कमर्शियल ब्रँड), स्वामित्व आणि नोंदणी कार्यालय, मुंबई येथे नोंदणीकृत आहेत.
संपर्क : डॉ. प्रशांत पाटील - ९३२४०९३३७७
(लेखक ‘हार्बोटिक्स बायोसायन्सेसचे संस्थापक आहेत.)
स्त्रोत: अग्रोवन