आपल्या रोजच्या जेवणातील भाज्यांमध्ये वांग्याची भाजी व पदार्थ अगदी नेहमी खाल्ले जातात. मात्र वांग्याचे उत्पादन करताना कीटक, रोग आणि नेमेटोड्सचा फार त्रास होतो व कधीकधी तर शेतकर्यां चे खूपच नुकसान होते. वांग्याची साल नरम असते हे एक आणि वांग्याचे पीक दमट हवामानात घेतले जाते हे दुसरे कारण ज्यामुळे त्यावर कीडकीटकांचा चटकन हल्ला होतो आणि ३५-४०% पर्यंत नुकसान होऊ शकते.
कीडनाशकांच्या अति वापरामुळे उद्भवणारे प्रश्न
किडीपासून होणारे नुकसान कमी करण्यासाठी वांग्यावर मोठ्या प्रमाणात कीडनाशके इ. फवारली जातात. मात्र ह्यामुळे.
- कमी मुदतीत तयार होणार्या् वांग्यांमध्ये ह्या औषधांचे अंश नक्कीच शिल्लक राहतात आणि त्याचे वाईट परिणाम खाणार्या च्या प्रकृतीवर होतात
- रासायनिक कीडनाशके सतत वापरल्यास किडींनाही त्यांची सवय होते आणि ते त्यांना दाद देत नाहीत. शिवाय एकंदर पर्यावरणावर व इतर वनस्पतींवर घातक परिणाम होतात.
मुख्य किडी
हड्डा बीटल:
पूर्ण वाढलेल्या किड्यांच्या तपकिरी अंगावर काळे ठिपके असतात तर ह्यांच्या अळ्या फिक्या पिवळसर असतात अंडी लांबट, पिवळसर रंगाची व एकत्रित घातलेली असतात. अळ्या व मोठे किडे पाने खरडतात व त्याखालील हरितद्रव्य खाऊन टाकतात त्यामुळे पानाच्या फक्त शिराच शिल्लक राहतात.
ऍफिड्स:
अळ्या व किडे पानातील रस शोषतात व त्यामुळे पाने पिवळी, वेडीवाकडी होऊन अखेर सुकतात. शिवाय त्यांनी पानांवर साठवलेल्या चिकट्यामध्ये (हनीड्यू) काळसर बुरशी वाढते व प्रकाशसंश्लेषणात अडथळा येतो.
खोड व फळे पोखरणारे किडे:
ह्यांच्या अळ्या सुरुवातीला नवीन फुटव्यांतच भोके पाडून ठेवतात व झाडाची वाढ खुंटते. सुरकुतलेले व निस्तेज फुटवे हे अगदी नेहमीचे लक्षण आहे. त्यानंतर ह्या अळ्या फळांमध्ये घुसल्याने ती खाणे अशक्यच असते.
लाल कोळी:
लाल कोळी व त्यांच्या अळ्यादेखील पानाच्या खालच्या पृष्ठभागावर हल्ला करतात. ह्यामुळे पाने दुमडली व अखेर चुरगाळली जातात
फोमोसिस चट्टे आणि फळे कुजणे:
ह्या रोगाचे लक्षण म्हणजे पानांवर उठणारे गोलाकार तपकिरी चट्टे. नंतर फळांवरही खोलगट फिके डाग दिसतात व लवकरच त्यांचा आकार वाढून ते संपूर्ण फळावर पसरतात आणि त्याचवेळी फळ आतून कुजू लागते.
पाने छोटी होणे:
छोट्या आकाराची ही पाने सहज लक्षात येतात. अशी पाने अरुंद, नरम व पिवळसर असतात. झाड एखाद्या चोट्या झुडुपासारखे दिसू लागते व सहसा त्याला फळेही धरत नाहीत.
स्क्लेरोटिनिया ब्लाइट:
मुख्य खोड वरून खालच्या दिशेने वाळू लागते. रोग गंभीर झाल्यास त्यावरील जोडांवर बुरशी वाढते व अखेरीस संपूर्ण झाड सुकते
मुळावर गाठी आणणारा किडा:
मुळांवर गाठी तयार होतात. झाडाची एकंदर वाढ खुंटते. शेतामधला अशा रोगग्रस्त झाडांचा भाग खुरटलेल्या झाडांमुळे ओळखू येतो.
एकात्मिक कीड-व्यवस्थापन पद्धती
रोपवाटिकेत वाढवणे
- जास्तीच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी व दमटपणा टाळण्यासाठी १० सेंमी उंचीचे गादी वाफे बनवा.
- ह्या गादीवाफ्यांवर जून महिन्यात ४५ गेजचे म्हणजे ०.४५ मिमी जाडीचे पॉलिथिन पसरा. ह्याने मातीवर सौरकरण प्रक्रिया होऊन मातीतून पसरणार्या रोगांचे (बॅक्टेरियल विल्ट किंवा नेमेटोड्स इ.) प्रमाण कमी होईल. अर्थात ह्यासाठी मातीमध्ये पुरेसा दमटपणा शिल्लक असल्याची खात्री करा.
- बुरशीचा शत्रू असलेले ट्रायकोडर्मा व्हिरिड ३ किग्रॅ शेतावरील खतात (FYM) २५० ग्रॅम या प्रमाणात मिसळा व कल्चर तयार होण्यासाठी सात दिवस तसेच ठेवून द्या. सात दिवसांनंतर ३ वर्ग मीटरच्या वाफ्यातील मातीत मिसळा.
- जुलैच्या पहिल्या आठवड्यात एफ१-३२१ सारखे लोकप्रिय हायब्रीड वाफ्यांमधून लावा. ह्याआधी बियांवर ट्रायकोडर्मा व्हिरिडची प्रक्रिया ४ ग्रॅम/ किग्रॅ. या प्रमाणात करा. वेळोवेळी तण काढा तसेच रोगग्रस्त रोपटी रोपवाटिकेतून काढून टाका.
मुख्य पीक
- किडे खाणार्याण पक्ष्यांनी शेताला भेट द्यावी ह्यासाठी १०/ एकर या प्रमाणात छोटी मचाणे उभारा म्हणजे त्यांना त्यावर उतरता येईल.
- टोळ, ऍफिड्स तसेच पांढर्याउ माशा चिकटून बसाव्या ह्यासाठी २-३/ एकर या प्रमाणात डेल्टा व चिकट सापळे ठेवा.
- शोषक किडींना अटकाव करण्यासाठी ५ % NSKE २ ते ३ वेळा फवारा.
- NSKE फवारल्याने पोखरणार्या किडींचे (बोअरर) प्रमाण खूपच कमी होते. ह्याकामी कडुनिंबाच्या तेलाचीही (२%) काही प्रमाणात मदत होते. तरीदेखील पानांवरच्या इतर शोषक किडींचे प्रमाण ETL पातळीच्या वर राहिल्यास इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल, १५० मिली/हे या प्रमाणात वापरा.
- खोड व फळाला भोके पाडणार्यार ल्युसिनोडस् ऑर्बोनालिस प्रकारच्या किड्यांना मोठ्या प्रमाणात अटकाव करण्यासाठी फेरोमोन तत्त्वावर काम करणारे सापळे ५/ एकर या प्रमाणे बसवा. दर १५-२० दिवसांनंतर सापळ्यांतील आमिष बदला.
- खोड व फळाला भोके पाडणार्याम किड्यांच्या अंड्यांना खाऊन जगणार्याळ (एग पॅरासॉइड) T. ब्रासिलिंसिस चा वापर १-१.५ लाख/ हे ह्या प्रमाणात दर आठवड्यानंतर ४-५ वेळा करा.
- नेमेटोड्स आणि खोडकिड्यांवर उपाय म्हणून कडुनिंबाची पेंड, २५० किग्रॅ/ हे (दोन वेळा) ह्या प्रमाणात, २५ व ६० दिवसांच्या अंतराने रोपांजवळील मातीत मिसळा.परंतु जोरदार वारा असल्यास किंवा तापमान ३०0से पेक्षा जास्त असताना हे करू नका.
- खोडकिड्याने पोखरलेले फुटवे व फळे नष्ट करा कारण वाफा व शेत स्वच्छ राखल्याने ह्या किडींना बराच अटकाव होतो.
- खोड पोखरणार्याी किडींचे प्रमाण ETL (५% रोगग्रस्तता) पातळीच्या वर गेल्यास सायपरमेथ्रिन २५ इसी चा वापर २०० g a.i/हे ०.००५%) अथवा कार्बारिल ५० डब्ल्यूपीचा वापर ३ग्रॅम/लिटर पाण्यातून करा. किंवा आपण एंडोसल्फान ३५ ईसी देखील ०.०७7% ह्या प्रमाणात वापरू शकता.
- वांग्याचेच पीक सतत घेतल्याने बोअररचे आणि सुकण्याचे प्रमाण वाढते. म्हणून वांग्यानंतर नॉन-सोलानेशिअस प्रकारची पिके घ्यावी.
- हड्डा बीटल्सची अंडी, अळ्या व किडे वारंवार गोळा करून नष्ट करा.
- छोटी पाने झालेली झाडे ओळखून नष्ट करा
- हिरवे खत, पॉलिथिन पसरणे, मातीमध्ये ब्लीचिंग पावडर मिसळणे असा उपायाने जीवाणूंमार्फत पसरणारे रोग आटोक्यात ठेवता येतात.
नैसर्गिक शत्रू (फायदेशीर किडे)
काय कराचे आणि काय करू नये?
हे करा
|
हे करू नका
|
- वेळेवर पेरणी
- शेताची स्वच्छता
- दरवेळी ताजा निंबोणीचा अर्क (NSKE) वापरणे.
- गरज असेल तेव्हाच कीडनाशकांचा वापर
- फळे वापरण्याआधी धुणे
|
- कीडनाशकाचा डोस सांगितल्यापेक्षा जास्त वापरणे
- एकाच प्रकारचे कीडनाशक पुनःपुन्हा वापरणे
- दोन कीडनाशकांचे मिश्रण करणे
- भाज्यांवर मोनोक्रोटोफॉससारखी जहाल कीडनाशके वापरणे
- काढणीआधी कीडनाशके वापरणे
- कीडनाशक फवारल्यानंतर 3-4 दिवस न थांबता लगेचच फळे खाणे
|
स्रोत: एकात्मिक कीड-व्यवस्थापनाच्या राष्ट्रीय केंद्राची विस्तारित पुस्तिका (ICAR) पुसा संकुल , नवी दिल्ली११०११२
|