1) सध्या तूर पीक फुले व शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. सद्यःपरिस्थितीत तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचे (हेलिकोव्हर्पा आर्मिजेरा) पतंग मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. या किडीच्या अळ्या कळ्या व फुलांवर दिसू लागल्या आहेत.
2) या किडींचा प्रादुर्भाव कळ्या, फुले लागल्यापासून शेंगापर्यंत आढळून येतो.
3) सध्या आढळणारी कीड ही अंडी अवस्था, प्रथम अवस्थेतील अळी असल्यामुळे वेळीच उपाययोजना केल्यास कमी खर्चात किडींचे नियंत्रण होऊ शकते.
4) सुरवातीच्या काळात अळ्या पिकाच्या कोवळ्या पानांवर, फुलावर किंवा शेंगांवर उपजीविका करतात. नंतर शेंगा भरताना त्या दाणे खातात. दाणे खात असताना त्या शरीराचा पुढील भाग शेंगांमध्ये खुपसून व बाकीचा भाग बाहेर ठेवून आतील कोवळ्या दाण्यावर उपजीविका करतात. या किडींमुळे तूर पिकाचे जवळपास 60 टक्के नुकसान होते.
5) प्रथिनांचे प्रमाण जास्त असलेल्या दाण्यावर अळी उपजीविका करते.
1) शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या पतंग नियंत्रणासाठी तुरीमध्ये एकरी चार कामगंध सापळे (फेरोमोन ट्रॅप्स) पिकांपेक्षा एक फूट उंचीवर लावावेत.
2) तुरीवरील मोठ्या अळ्या वरचेवर वेचून त्यांचा नायनाट करावा.
3) पीक कळी अवस्थेत असताना 5 टक्के निंबोळी अर्काची (अझाडिरेक्टीन) फवारणी करावी.
4) अळ्या लहान अवस्थेत असतानाच एच.ए.एन.पी.व्ही. विषाणूजन्य कीटकनाशकाची प्रति हेक्टरी 250 एल.ई. (-----मिली प्रति लिटर) या प्रमाणात फवारणी करावी.
5) जर किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानाच्या पातळीच्या वर आढळून आल्यास क्लोरपायरीफॉस (25 टक्के प्रवाही) 25 मि.लि. किंवा प्रोफेनोफॉस (40 टक्के प्रवाही) 25 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
6) अळीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेंझोएट (5 टक्के) 4 ग्रॅम किंवा फ्ल्युबेन्डीयामाईड (39.35 एस.सी.) 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
7) शिफारशीत कीटकनाशकाचा वापर आलटून पालटून गरज पडल्यास 10 दिवसांच्या अंतराने करावा.
1) हरभरा लागवड करण्यापूर्वी प्रति 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम रायझोबियम,250 ग्रॅम पीएसबी आणि 40 ग्रॅम ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करावी.
2) उगवण झालेल्या हरभऱ्यामध्ये प्रतिहेक्टर पाच कामगंध सापळे लावावेत. तसेच 50 पक्षिथांबे उभारावेत.
3) मर रोगाच्या नियंत्रणासाठी 2 ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.
संपर्क ः डॉ. बी. बी. भोसले (संचालक विस्तार शिक्षण) ः 9423437894
डॉ. पी. आर. झंवर (विभागप्रमुख, कीटकशास्त्र विभाग) ः
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
स्त्रोत: अग्रोवन २३ नोव्हेंबर २०१४
अंतिम सुधारित : 10/7/2020
डाळिंब पिकामध्ये बॅक्टेरिअल ब्लाइट, मर (फ्युजॅरिय...
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...
अॅडिसन रोग : (बाह्यकज-प्रवर्तक-न्यूनता). अधिवृक्क...
ढगाळ हवामानामुळे मावा किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची...