सुत्रकृमी लांब धाग्यांप्रमाणे असून उघडया डोळयाने दिसू शकत नाही. सुत्रकृमींची लांबी 0.20 ते 1.10 मिलीमीटर असून व्यास 0.005 ते 0.01 मिलीमीटर असते. मादी सुत्रकृमी चंबुच्या आकाराची असते. सुत्रकृमीमुळे झालेल्या जखमांतून रोगकारक बुरशी झाडांमध्ये प्रवेश करते. त्यामुळे पिक विविध प्रकारच्या रोगांना बळी पडते.
सुत्रकृमी परीक्षणासाठी माती व मुळांचा नमुना तपासणीला पाठवण्यासाठी प्रथम शेतामधील बांधाकडील 1 मीटर अंतर सोडून नमुना घ्यायची ठिकाणे निश्चित करा. नमुना घेण्यापूर्वी या ठिकाणची माती थोडी ओलसर असावी. नमुना घेण्याच्या ठिकाणचा 2-3 सेंटीमीटर जाडीचा वरचा थर हाताच्या सहायाने बाजूला करावा. त्या ठिकाणी 15 ते 20 सेंटीमीटर खोलीचा खड्डा घेऊन त्या ठिकाणाहुन 50 ते 100 ग्रॅम मुळांसहीत मातीचा नमुना घ्यावा. अशा प्रकारे एकरी 4 ते 5 ठिकाणाहून मातीचा नमुना घ्यावा. नमुना घेताना नागमोडी पद्धतीने घ्यावा. घेतलेले सर्व नमुने एकत्र करून पॉलीथीन पिशवी मध्ये भरून पिशवीचे तोंड दोरीच्या सहाय्याने घट्ट बांधून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत.
स्त्रोत : पोर्टल कन्टेट टिमअंतिम सुधारित : 5/8/2020
चुनखडीयुक्त जमिनीमध्ये नत्र, स्फुरद, पालाशचे प्रमा...
माती हा अत्यंत महत्त्वाचा पण नेहमीच दुर्लक्षित राह...
या विभागात जिप्सम म्हणजेच कॅल्शियम सल्फेट हे कमी ख...
या विभागात माती परीक्षण करण्यासाठी मातीचे नमुण्याच...