हवामान अत्यंत बेभरवशाचे झाले आहे. दुष्काळ, गारपीट, पाऊस, थंडी, उष्ण तापमान आदी घटक शेतीवर परिणाम घडवू लागले आहेत. भविष्यात हवामानाशी सुसंगत उपाययोजना वा तंत्रज्ञानाचा शोध व त्याकडे वळणे गरजेचे झाले आहे. त्यावर टाकलेला संक्षिप्त दृष्टीक्षेप.
गारपीट व अवकाळी पावसाने महाराष्ट्रात नुकताच हाहाकार उडवला. मात्र शेतकऱ्यांनी हतबल होण्याची गरज नाही. पिकांचे अशा आपत्तीपासून संरक्षण करण्याचे उपाय आहेत, जगभरात ते वापरलेही जातात. त्याविषयी.
नेटहाऊस क्षेत्रातील काही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी अँटिहेल तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपयोगी ठरू शकेल असा विश्वास व्यक्त केला आहे. ऍग्री प्लास्ट कंपनीचे राजीब रॉय यांना नेटहाऊस विषयातील अनेक वर्षांचा अनुभव आहे. नागपूर येथे लवकरच आपण यासंबंधीचा प्रयोग करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गुजरातस्थित नील ऍग्रिटेक कंपनीचे अधिकारी अनंत पाटसकर यांच्या मते अँटिहेलसारख्या नेटसाठी प्रति चौरस मीटरचा खर्च 70 ते 80 रुपये याप्रमाणे एकरी तो तीन लाख रुपयांपर्यंत येऊ शकेल. मात्र त्यासाठी लागणाऱ्या हार्डवेअरचा खर्च वेगळा असेल.
गार तयार होण्याची अवस्थाच बिघडवून टाकण्याचे काम छायाचित्रात दिसणाऱ्या या यंत्राद्वारा केले जाते. ज्या वेळी वादळी हवामान स्थिती तयार होते, गारा पडण्याची शक्यता दिसू लागते, त्या काळात त्याचा वापर करायचा असतो. या यंत्रात विशिष्ट पद्धतीने तयार केलेला ब्लास्ट चेंबर आहे. त्याद्वारा ऍसिटीलीन वायू आणि हवेला उद्दिप्त केले जाते. त्यातून स्फोटासारखा दाब उत्पन्न होऊन त्याच्या तीव्र लहरी तयार होतात. त्यांचा मोठा आवाज निर्माण होतो.
ध्वनीच्या वेगाने त्या आकाशात घुसतात. त्यांच्याद्वारा गार तयार होण्याच्या प्रक्रियेत अडथळा तयार होऊन तिची निर्मिती थांबवली जाते. मात्र गार जर तयार झालेली असेल तर ती मात्र या यंत्राद्वारा वितळवता येत नाही. पाचशे मीटरच्या परिघापर्यंत हे यंत्र प्रभावशाली काम करू शकते. प्रत्येकी चार सेकंदांनी या यंत्राद्वारा अशा प्रकारे फायरिंग करता येते. यंत्र चालू-बंद करण्यासाठी मनुष्यबळाऐवजी रडार नियंत्रित यंत्रणेचा वापरही केला जाऊ शकतो. न्यूझीलंडमधील एका कंपनीने हे यंत्र विकसित केले असून अनेक वर्षांपासून या देशात त्याचा वापर केला जातो.
गारारोधक नेट तंत्रज्ञानाविषयी तमिळनाडूस्थित ऍग्रीप्लास्ट कंपनीचे राजीब रॉय यांनी दिलेली माहिती अशी
इस्राईल किंवा जगभरात अशा प्रकारचे प्रकल्प यशस्वी झाले आहेत.
या देशात मोरोक्कोप्रमाणे नियंत्रण व्यवस्थापन न करता केवळ पॉलिहाऊसमध्ये सुमारे अडीच हजार एकरांवर केळी पीक घेतले जात आहे. हा देश केळी निर्यातीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरत आहे. त्यामुळे केळीची गुणवत्ता टिकवण्यासाठी देश प्रयत्नशील आहे.
इस्राईलमध्ये उच्च तापमानापासून बचाव करण्यासाठी व त्या अनुषंगाने पाण्याची बचत करण्यासाठी शेडनेटमध्ये केळी घेतली जात आहेत.
बटाटा हे पंजाबचे मुख्य रब्बी पीक. या पिकात उशिराचा करपा (लेट ब्लाइट) हा अत्यंत महत्त्वाचा रोग आहे.
हे लक्षात घेऊन लुधियाना येथील पंजाब कृषी विद्यापीठाच्या वनस्पती रोगशास्त्र विभागाने "इंटरनेटद्वारे हवामानातील घटकांवर आधारित रोगाचा आगाऊ इशारा व सल्ला' हा प्रकल्प यशस्वी केला. रोग येण्यासंबंधी शेतकऱ्यांना आधीच सावध करणारे वा इशारा देणारे "फोरकास्टिंग' मॉडेलही तयार केले. त्याची अंमलबजावणीही केली.
विद्यापीठातील वनस्पती रोगशास्त्र विभागप्रमुख डॉ. पी. पी. सिंग ऍग्रोवनशी बोलताना म्हणाले की, हा प्रकल्प विद्यापीठात 2008 मध्ये सुरू झाला. तो पूर्ण झाला आहे. त्याचा प्रसार अद्याप शेतकऱ्यांपर्यंत सुरू आहे. पंजाबातील सहा महत्त्वाच्या ठिकाणी "ऍटोमॅटिक वेदर स्टेशन' बसविण्यात आली आहेत.
कोणत्याही किडी-रोगाच्या नियंत्रणासाठी असा प्रकल्प सुरू करायचा तर त्याविषयीचा काही वर्षांचा पुरेसा "डाटा' असणे महत्त्वाचे असते. त्यानंतर या पद्धतीची शास्त्रीय सिद्धता पडताळावी लागते. प्रयोगशाळेत चाचण्या घ्याव्या लागतात.
आम्ही राबविलेला प्रकल्प हा विद्यापीठाचा स्वतंत्र उपक्रम आहे. पंजाब सरकारचा त्यात सहभाग नाही. शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा मिळत आहे. बटाटा उत्पादकांत आम्ही सातत्याने या पद्धतीविषयी जागृती करतो आहे. इथल्या शेतकऱ्यांची नवी पिढी आमच्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर या पद्धतीविषयी माहिती व सल्ला पाहते व त्यानुसार पीक नियोजन करते. या सल्ल्यामुळे रोगाचा आगाऊ इशारा मिळू लागल्याने पिकाची योग्य काळजी घेणे व बुरशीनाशकांच्या अनावश्यक फवारण्या वाचवणे त्यांना शक्य झाले आहे. कोणत्याही राज्यात असा प्रकल्प राबवला जाऊ शकतो. आपल्या भागातले मुख्य पीक, मुख्य किडी-रोग ओळखून तसे काम सुरू केले पाहिजे. "वेदर स्टेशन'ची देखभाल करणे अवघड गोष्ट नाही. ते आम्ही करून दाखविले आहे. आता खरबूज, कलिंगडावरील डाऊनी रोग आदींवर आम्ही याच पद्धतीने काम सुरू केले आहे.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
ही गोष्ट आहे अकोल्याच्या ज्योतीताईंची...! अकोला जि...
नैसर्गिक आपत्तीने अनेक वेळा दस्तक दिल्यानंतर आता र...
सांगली जिल्ह्यातील कासेगाव (ता. वाळवा) येथील संपतर...