केरळ हे राज्य पर्यटनाच्या बरोबरीने मसाला पिकांच्या उत्पादनासाठी ओळखले जाते. पूर्वीपासून केरळमधील बंदरांमधून आफ्रिका, दक्षिण-पूर्व आशिया, अरब देशांमध्ये मसाल्याचा व्यापार होत आहे. येथे येणाऱ्या विविध देशांतील पर्यटकांच्या समोर आता राज्यातील मसाला पिकांची जैवविविधता मांडण्यात येणार आहे. यामागचा हेतू असा आहे, की पर्यटनाच्या बरोबरीने मसाल्यांच्या निर्यातीलाही यातून संधी मिळणार आहे.
या उपक्रमासाठी केरळ सरकारने दिल्लीमध्ये विविध देशांतील राजदूतांची परिषद घेतली. या प रिषदेमध्ये पर्यटन व्यवसायाच्या बरोबरीने कृषी क्षेत्रातील संशोधन सहकार्याबाबतही व्यापक चर्चा झाली, त्याचा केरळमधील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
या उपक्रमाला "युनेस्को', नेदरलॅन्ड आणि इराणचे देखील सहकार्य मिळणार आहे. या प्रकल्पा मुळे पर्यटन उद्योगाला चालना मिळेलच, त्याचबरोबरीने कृषी संशोधन आणि मसाला पिकांच्या व्यापाराला नवीन संधी उपलब्ध होत आहेत, अशी माहिती केरळचे अर्थमंत्री डॉ. थॉमस यांनी दिली.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
हिमाच्छादित शिखरे सोडली तर महाराष्ट्रात अमर्याद पर...
आजच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणावापासून मुक्ती मिळण...
धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनातून काही प्रमाणात उ...
महाराष्ट्रासारख्या विस्तीर्ण पसरलेल्या राकट देशा.....