पिकामध्ये मातीतून येणाऱ्या रोग व किडीमुळे मोठे नुकसान होत असते. ते टाळण्यासाठी प्रामुख्याने रासायनिक पद्धतीचा वापर केला जातो. मात्र, दक्षिण अरिझोना येथील पॉलीटनेलमध्ये सौर निर्जंतुकीकरणासाठी जमिनीवर पारदर्शक आच्छादनाचा वापर अधिक फायदेशीर असल्याचे दिसून आले आहे. उन्हाळ्यामध्ये एका आठवड्यापेक्षा कमी काळामध्ये निर्जंतुकीकरण करणे शक्य होते. हे संशोधन "हॉर्ट सायन्स'मध्ये प्रकाशित झाले आहे.
ज्या भागामध्ये अधिक सूर्यप्रकाश उपलब्ध असतो, अशा ठिकाणी सौर निर्जंतुकीकरण ही पद्धती अधिक फायदेशीर ठरू शकते. ही पद्धती अन्य फ्युमिगेशन सोबतही वापरता येते. निर्जंतुकीकरणाच्या कार्यक्षमता मातीचे तापमान किती वाढते, त्यावर अवलंबून असते. ओलसर मातीमध्ये पाण्याची वाफ होऊन तापमान अधिक काळ वाढलेले राहते. हॉर्ट सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, दक्षिण अरीझोना येथील तापमान सौर निर्जंतुकीकरणासाठी आदर्श आहे. संशोधक उर्सुला शुच, हॅन्सन आणि टिलक महातो यांनी पारदर्शक पॉलीइथिलीन आच्छादनांची कार्यक्षमता तपासण्यासाठी काही प्रयोग केले. त्यांनी विविध प्रकारच्या पॉलीइथिलीन सोबत तुलनात्मक अभ्यास केला. त्यातून पिकातील तणे आणि अन्य किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत होऊ शकेल. त्याविषयी माहिती देताना उर्सुला शुच यांनी सांगितले, की अन्य महिन्याच्या तुलनेमध्ये जून महिन्यात या विभागामध्ये दिवसा सूर्याची किरणे आणि तापमान अधिक राहते. उन्हाळ्यातील महिन्यांच्या सुरवातीच्या काळात सापेक्ष आर्द्रताही कमी असते, त्यासोबत वाढलेले तापमान सौर निर्जंतुकीकरणाकरिता आदर्श ठरते. या कालावधीमध्ये लागवडीची क्षेत्रेही तयार होत असतात.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
जगभरात तेलाचा वापर फार पूर्वीपासून होतो आहे. पूर्व...
मुख्यमंत्री सौर वाहिनी योजने विषयी माहिती.
जर्मनीमध्ये यंदा सौर ऊर्जा उत्पादनांसाठीचे अनुदान ...
साठवणीसाठी धान्य योग्य आर्द्रतेपर्यंत सुकविणे आवश्...