सेंद्रिय शेतीची वाटचाल जगभरातील विविध देशांमध्ये सकारात्मक सुरू असल्याचे चित्र आपल्याला दिसून येत आहेच. विशेषतः युरोप व अमेरिका याबाबत आघाडी घेताना दिसत आहेत. स्कॉटलंडचे उदाहरण पाहा, तेथील सरकारनेच विधायक पाऊल उचलून तेथील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी अधिक प्रोत्साहन दिले आहे. स्कॉटिश ग्रामीण विकास कार्यक्रमांतर्गत सरकारने सेंद्रिय शेतीसाठी राष्ट्रीय उद्दिष्ट निश्चित केले आहे. तेथील संबंधित महाविद्यालयांना मदतीला घेतले जाणार आहे. हवामान बदल, जैवविविधता, पशुकल्याण आदी विषयांतील सरकारी धोरणांचा अभ्यास करून सेंद्रिय उत्पादकांचे कशा प्रकारे हित साधले जाईल याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासंबंधी स्कॉटिश सरकार कृती आराखडा तयार करीत आहे. तेथील सरकारी अधिकारी म्हणतात, की बाजारपेठेत ताज्या, स्थानिक व हंगामी मालाला चांगली मागणी आहे.
उच्च दर्जाचा माल पिकवण्याची आमची क्षमता आहे, त्यासाठी शेतकरी एकत्र येत आहेत. स्कॉटलंडमध्ये सेंद्रिय शेती महत्त्वाचे कार्य करीत आहे. देशात सेंद्रिय पदार्थांची वार्षिक विक्री 55 दशलक्ष पौंडहून अधिक आहे. त्याचबरोबर इंग्लंड व युरोपीय बाजारपेठेतही सेंद्रिय पदार्थांना चांगली मागणी असल्याचे या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
नैसर्गिक आपत्तीने अनेक वेळा दस्तक दिल्यानंतर आता र...
सांगली जिल्ह्यातील कासेगाव (ता. वाळवा) येथील संपतर...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे ...