वाळ्याच्या सुगंधी तेलाचा वापर अत्तरे, सौंदर्य प्रसाधने, साबण उद्योगात मोठ्या प्रमाणावर केला जातो. हे तेल अन्य सुगंधी तेलांबरोबर (पाचौली, गुलाब, चंदन) उत्तम रीतीने मिसळते. वाळ्याची मुळे चटया, पंखे, टोपल्या बनविण्यासाठी वापरतात. वाळा (खस) गवताची जमिनीची धूप थांबविण्यासाठी लागवड करतात.
वाळा हे बहुवार्षिक गवत एक ते दोन मीटर उंच वाढते. याला भरपूर तंतू-मुळे असून, ती अतिशय खोलवर गेलेली असतात. मुळे सुवासिक असतात. पाने गवतासारखी, 30 ते 90 सें. मी. लांब असून, रंगाने फिकट हिरवी, वरून गुळगुळीत व कडांना कुसळे असतात. हलक्या ते भारी जमिनीमध्ये लागवड करता येते. तांबड्या व गाळाच्या जमिनीत मुळांची चांगली वाढ होत असून, मुळांमध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते. जून, जुलैमध्ये 60 ते 75 सें. मी. अंतरावर सरी-वरंबे किंवा जमिनीचा उतार व मगदुरानुसार योग्य आकाराचे (2 x 4 मीटर) सपाट वाफे तयार करावेत. 75 x 30 सें. मी. अंतरावर लागवड करावी. लागवडीसाठी एका वर्षाच्या गवतापासून आलेले फुटवे वापरावेत. लागवडीसाठी के. एस.- 1, के. एस.- 2 व सुगंधा या जाती निवडाव्यात.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
इसबगोलाचे बी शीतल, शामक, मूत्रल (लघवी साफ करणारे) ...
एरंड ही वर्षायू किंवा बहुवर्षायू वनस्पती युफोर्बिए...
आवळा तुरट, आंबट चवीचे, हिवाळ्यात येणारे हिरव्या रं...
वनस्पती औषधी व क्षुपे (झुडपे) असून त्यांचा प्रसार...