नेसर्गिक संपत्तीच्या दिवसेंदिवस वाढत चालेल्या शोषणामुळे आपल्या पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. झाडझाडोरा नसलेल्या उघड्या परिसरातील पावसाचे पाणी न मुरताच वाहून जाते. झाडांच्या वाढीला अत्यंत आवश्यक असा मातीचा मौल्यवान थरही आपण या पाण्याबरोबर गमावतो .जमिनीच्या वरील भागातील सकस माती वाहून गेल्याने तिथे झाडे उगवत नाहीत .झाडे नसल्याने पाणी वाहून जाते त्याचबरोबर मातीही वाहून जाते.असे हे दुष्टचक्र आहे.पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम हे यावरील उत्तर आहे.
हि व्हिडीओ फिल्म माथा ते पायथा या दृष्टीकोनातून महत्व स्पष्ट करते .लागवडी अयोग्य पडीक उपचार वहीती लायक शेतीवरील प्रक्षेत्र उपचार नाल्यावरील उपचार याबद्दल माहिती या व्हिडियो फिल्म मध्ये आहे. पाणलोट क्षेत्रविकासाचे काम माथ्य पासून सुरु होऊन ते पायथ्यपर्यंत विस्तारण्या मागील कारणे तसेच त्यामध्ये अंतर्भाव असलेल्या तांत्रिक तसेच सामाजिक पैलूंवर हि फिल्म प्रकाश टाकते.
स्त्रोत - वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 10/7/2020
दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात आदिवासिंच...
मोठी गुंतवणूक करून एखादा कृषी प्रक्रिया उद्योग उभा...
आयसीडीएस कार्यक्रम केंद्गशासनाच्या महिला व बाल विक...
गाळपाच्या हंगामादरम्यान पुरेसा ऊस उपलब्ध असण्याची ...