तंत्र कूपनलिका पुनर्भरणाचे...
- कूपनलिका पुनर्भरण सयंत्र दोन भागात विभागले आहे. प्रथम भाग म्हणजे प्राथमिक गाळण यंत्रणा शेतातील पावसाचे वाहते पाणी चरांद्वारे वळवून एकत्रितरीत्या प्राथमिक गाळण यंत्रणेपर्यंत आणावे.
- प्राथमिक गाळण यंत्रणेत 1 मीटर x 1 मीटर x 1 मीटरचा खड्डा तयार करून यात मोठे व छोटे दगड टाकावेत. या गाळण यंत्रणेतून तीन इंच व्यासाचा पीव्हीसी पाईप मुख्य गाळण यंत्रणेत सोडावा.
- प्राथमिक गाळण यंत्रणेमुळे पावसाच्या पाण्याबरोबर वाहून येणारा काडी कचरा, तसेच काही प्रमाणात गाळ अडविण्यास मदत होईल. मुख्य गाळण यंत्रणेत कमी गाळाचे पाणी जाऊन मुख्य गाळण यंत्रणेची कार्यमान आयुष्य वाढविण्यास मदत होईल.
- दुसरा भाग म्हणजे मुख्य गाळण यंत्रणा. यामध्ये कूपनलिकेच्या सभोवताली दोन मीटर व्यासाचा 2.5 मीटर खोल खड्डा करावा. त्यातील माती वर काढून घ्यावी. तसेच केसिंग पाईप पूर्णपणे स्वच्छ करून घ्यावा. केसिंग पाईपला खालून 30 सें.मी. उंचीपर्यंत बारीक छिद्र करावे. त्यावर नायलॉन जाळीने झाकून पक्के बांधावे.
- त्यानंतर खालून 50 सें.मी. उंचीपर्यंत मोठे दगड, त्यानंतर 10 सें.मी. उंचीपर्यंत छोटे दगड व त्यावर 30 सें.मी. उंचीपर्यंत मोठी वाळू व त्यावर 20 सें.मी. उंचीपर्यंत बारीक वाळूचे थर घ्यावे, यानंतर सिमेंट रिंग दोन मीटर व्यासाची ठेवून मुख्य गाळण यंत्रणेचे काम पूर्ण करावे. वरच्या भागात सिमेंट रिंग ठेवण्याचा उद्देश म्हणजे बाजूची माती खड्ड्यात किंवा गाळण साहित्यावर पावसामुळे घसरून पडणार नाही. संपूर्ण यंत्रणा दीर्घकाळापर्यंत सुस्थितीत राहते.
संपर्क - मदन पेंडके, 9890433803.
(लेखक अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन केंद्र,
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे कार्यरत आहेत.)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.