संबंधित माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विमा आधुनिकीकरणाच्या माध्यमातून व्यापाराचे प्रभावी व्यवस्थापन सुनिश्चित करणे आणि राज्याच्या विकासात महत्त्वाचे योगदान देणे.”
आमची मोहीम
विभागाच्या मोहिमेअंतर्गत
- ग्राहकांशी योग्य प्रकारे, सौजन्याने आणि निरपेक्षपणे सर्व व्यवहार करणे
- प्रस्थापित मापदंड सुधारण्याच्या दृष्टिने देऊ केलेल्या सेवांच्या दर्जाचे वार्षिक पुनरावलोकन
विभागाचा संदेश
शासकीय विमा निधीची स्थापना महाराष्ट्र शासनाने शासकीय/ निमशासकीय विभाग, मंडळे, महामंडळे, जिल्हा परिषदा, नगर परिषदा, महानगरपालिका, सहकारी क्षेत्रातील विविध कंपन्या यांच्या विमाविषयक गरजा भागविण्यासाठी केली असून या निधीचे व्यवस्थापन वित्त विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली विमा संचालनालय या कार्यालयामार्फत पाहिले जात आहे. ही राज्य शासनाची स्वयंविमा योजना असून विमाव्यवहार हाताळून राज्याच्या विकासासाठी विनाकर महसूल मिळवून देण्यासाठी प्रत्येक कार्यालय प्रमुखाने शासन निर्णयानुसार त्यांच्या विमाविषयक गरजा शासकीय विमा निधीकडे थेट अथवा अप्रत्यक्षपणे सहविमापध्दतीने विमा उतरवून भागविणे ही वित्तीय शिस्तीची बाब आहे. प्रत्येक कार्यालय प्रमुखाने शासन निर्णयांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून शासनाच्या विनाकर महसुलाचे संरक्षण करावे.
माहिती संकलन : छाया निक्रड