वन रँक वन पेन्शन म्हणजे सैन्य दलात समानकाळ सारख्याच पदावर सेवा केलेले दोन माजी सैनिक जरी वेगवेगळ्या वेळी निवृत्त झाले तरी त्या दोघांना सारखेच निवृत्तीवेतन मिळणे.
सेवा निवृत्ती वेतन : अखेरच्या पगाराच्या किंवा मागील १० महिन्यांच्या सरासरी पगाराच्या ५०% यापैकी जे जास्त असेल ते, कमीतकमी ९००० रुपये प्रती महिना . यासाठी अधिकारी पदावर असलेल्या व्यक्तीची २० वर्षे तर त्या दर्जाखालील व्यक्तीची १५ वर्षे सेवा अत्यावश्यक
सामान्य कुटुंब निवृत्तीवेतन : अखेरच्या पगाराच्या ३०%, कमीतकमी ९००० रुपये प्रती महिना (व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास)
विशेष कुटुंब निवृत्तीवेतन : अखेरच्या पगाराच्या ६०% (सेवेत असताना मृत्यू झाल्यास )
उदारीकृत कौटुंबिक निवृत्तीवेतन : वीरमरण / हुतात्मा झाल्यास अखेरच्या पगाराइतके निवृत्तीवेतन
अपंग निवृत्तीवेतन : वित्त मंत्रालय, खर्च विभागाच्या अनोमाली कमिटीकडे बाब संदर्भित केलेली आहे
युद्धजखमी निवृत्तीवेतन : युद्धात जखमी होऊन १००% अपंगत्व आल्यास शेवटच्या पगाराइतके, आणि १००% पेक्षा कमी अपंगत्व आल्यास शेवटच्या पगाराच्या ६०%
- १ जुलै २०१४ पासून अंमलबजावणी
- थकीत रक्कम सहा महिन्यांच्या हप्त्यात चार वर्षात देणार
- दर पाच वर्षांनी योजनेची समीक्षा केली जाईल
- एकसदस्यीय समितीकडून समीक्षा केली जाईल
- स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्यांना लाभ मिळणार नाही
- निवृत्तीवेतनासाठी २०१३ वर्ष आधारभूत मानले जाईल
संदर्भ : पूर्व सैनिक कल्याण विभाग, भारत सरकार
अंतिम सुधारित : 8/7/2020