অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लहवाला

लहवाला

उत्तर भारतातील एक अनुसूचित जमात-समूह. लाहूल, लाहुली, लाहौल इ. नावांनी तो परिचित आहे. हिमाचल प्रदेशातील लाहूल खोऱ्यात त्यांची प्रामुख्याने वस्ती असल्यामुळे त्यांना हे नाव प्राप्त झाले असावे. या समूहात मुख्यतः ब्राह्मण व ठाकूर आहेत. ठाकूर गोत्रात गौतम, बुरामशिंगपा, फागपा व लहवाला युवतीलहवाला युवतीजमशेरपा ही प्रमुख गोत्रे अंतर्भूत होतात. या जाति-जमाती स्थलवैशिष्ट्याने व भाषा वैशिष्ट्याने एकत्र गणल्या गेल्यामुळे लहवालांची १९६१ च्या जनगणनेनुसार अनुसूचित जमातीत जरी नोंद झाली असली, तरी त्यांची गणना भारतातील इतर आदिवासींशी करता येणार नाही; कारण त्यांच्यात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र अशा हिंदू संस्कारनिष्ठ जाती-धर्माचा प्रादुर्भाव आढळून येतो. लहवालांमध्ये भोट लोक असल्यामुळे भूतानातला बौद्ध, शैव व वैष्णव धर्मही त्यात आढळतो. पंजाब आणि उत्तर प्रदेशांतील हिंदू संस्कार व तिबेटमधील बौद्ध व मंगोलॉइड सामाजिक संस्कार त्यांच्यात आढळतात.

संदर्भ : 1. Bahadur, K. P. Casic, Tribes and Culture of India, Vol. VI, New Delhi, 1978.

2. Negi, T. S. Scheduled Tribes of Himanchal Pradesh, Simla, 1976.

3. Shashi, S. S. Himachal:Nature's Peaceful Paradise, Delhi, 1971.

लेखिका : दुर्गा भागवत

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate