महिला बचतीचं प्रशिक्षण घेण्याचं
अहो कारभारी, कारभारी, आज लवकर जायाचं
महिला बचतीचं प्रशिक्षण घेयाचं
महिला बचतीचं कौशल्य घेयाचं II ० II
मूल्यमापनात कमी हाय कुठं
प्रशिक्षणात समजून घेऊ
पैसा बचतीत वाढवावयाचा कुठं
त्याची गरज समजून घेऊ
अहो जोडीनं, जोडीनं सारं ध्यानात घेयाचं II १ II
कमी पडलो कुठं हो आपुन
दिल्या ज्ञानाला ठेऊ साठवून
केल्या कामाशी घेऊया मापून
कच्च्या दुधालं घेऊया तापून
दिल्या शिक्षणाचा, शिक्षणाचा पाठपुरावा घेयाचा II २ II
घेऊन नव्या विचार, कल्पना
आपल्या गटात माहिती देऊ
मांडलेल्या नव्या संकल्पना
बचत गटाची बैठक घेऊ
सांगू समजून, समजून गट कशानं वाढवायचा II ३
लेखक : वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट
स्त्रोत : बोल अनुभवाचे - पुस्तिका
अंतिम सुधारित : 7/12/2020
टसर कोषाचे उत्पादन हे अतिशय कष्टाचे आणि जोखमीचे का...
रत्नागिरी जिल्ह्यात सह्याद्रीच्या रांगेत वसलेले मु...
खातेदार किंवा गिऱ्हाईक हे कर्ज घेण्यासाठी नेहमीच इ...
प्रामुख्याने गरिबांच्या जीवनात त्यांच्या दैनंदिन ज...