कंधार तालुक्यातील फकीर दरेवाडी, हे आमचे छोटेसे गाव. आमच्या गावात पाणलोट क्षेत्राचे काम सुरु झाले. त्या वर्षापासूनच गावात स्वयंसाहाय्य गटाची सुरुवात झाली होती. दर महिन्याला रु. २०/-प्रत्येक महिला बचत करते. नुसतेच गट करून आम्ही थांबलो नाही, तर आम्ही महिलांनी एक संयुक्त महिला समिती तयार केली.
संयुक्त महिला समितीमार्फत विविध व्यवसायासाठी कर्ज वाटप केले जाते. या समितीमार्फत आम्ही गावात खत विक्रीचा धंदा करण्याचे ठरवले. त्यासाठी आम्ही गावात सुरुवातीला खत विक्री होईल, की नाही, याचा अंदाज घेतला. त्यानुसार खत विक्रीचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.
गावाची परिस्थिती
गावातील शेतकऱ्यांना खत आणण्यासाठी गावापासून १० ते १२ कि.मी. दूर असलेल्या कंधार या तालुक्यात जावे लागत असे. प्रत्येक शेतकऱ्याला २ ते ३ खताच्या गोण्या घेऊन येण्यासाठी ५० ते ६० रु. वाहतूक खर्च येत असे. पावसाळ्यात रस्ते खराब होत असल्यामुळे खत आणण्यासाठी खूप त्रास होई व लोकांची एका दिवसाची मजुरी बुडत असे.
गावातील शेतकऱ्यांची ही परिस्थिती पाहून, आम्ही संयुक्त समितीमध्ये संस्थेचा जो प्रतिनिधी आहे, त्याच्या मार्गदर्शनानुसार आम्ही खात विक्रीचा व्यवसाय करण्याचे ठरवले. खत आणून देण्याची जबाबदारी, ही समिती मधील दोन महिला संस्थेचा मार्गदर्शक याची होती. खात हे पेरणीच्या हंगामात जेव्हा मशागतीचे काम चालू होते तेव्हा एकदम ट्रक भरून माल आणत आणि त्याची जागेवरच विक्री करत. त्या ठिकाणी खताच्या विक्रीचा हिशोब करण्यासाठी समितीमधील काही महिला उपस्थित राहत आणि त्या विक्रीचा हिशोब ठेवत.
यामध्ये मात्र एका गोष्टीचा आम्हाला अनुभव आला, की जागच्या जागी विक्री केल्यामुळे बराच फायदा झाला. खत साठवण्यासाठी जागेचा प्रश्न उभा राहिला नाही. राखणदार ठेवण्याची गरज पडली नाही. रोख रक्कम एकदम हातात मिळाली. भांडवल गुंतून पडले नाही.
महिलांना व्यवहाराचा एक अनुभव यावा यासाठी हा धंदा आम्ही केला. ५० गोण्यांची विक्री करून आम्हाला रु. ५००/- चा फायदा झाला. आमच्याबरोबर गावातील शेतकऱ्यांना देखील फायदा झाला तो असा, की त्यांचा वाहतूक खर्च वाचला आणि रोजंदारीपण बुडाली नाही. सुरुवातीला आम्हाला भीती होती, की आमचे खत विकले जाईल की नाही. पण ती भीती दूर झाली. खात विक्रीच्या वेळी आजूबाजूच्या खेडयातील शेतकरी पण खत खरेदी करण्यास येऊ लागले.
खत विक्रीच्या धंद्यातून आम्हाला बरेच काही शिकायला मिळाले. दुसऱ्याशी व्यावहारिकपणे कसे बोलावे, कसे वागावे हे समजले. व्यवहार कसा करावा, विक्री कशी करावी, हिशोब कसा ठेवायचा व कसा मांडायचा हे शिकलो. त्यामुळे आमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. विचारपूर्वक निर्णय घेता येऊ लागले.
खालील मुद्द्यांवरून आपल्या लक्षात येईल, की आपण जो उपक्रम हाती घेणार आहोत त्यात फायदा होईल की तोटा ते समजते.
लेखक : वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट स्त्रोत : बोल अनुभवाचे - पुस्तिका |
अंतिम सुधारित : 7/31/2020
टसर कोषाचे उत्पादन हे अतिशय कष्टाचे आणि जोखमीचे का...
दारिद्रयाचे दुष्टचक्र नष्ट करण्यासाठी आपणास एका पर...
रत्नागिरी जिल्ह्यात सह्याद्रीच्या रांगेत वसलेले मु...
प्रामुख्याने गरिबांच्या जीवनात त्यांच्या दैनंदिन ज...