অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनासाठी

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनासाठी

नागरी/शहरी पूर आपत्ती प्रसंगी पूर्वतयारी व प्रतिबंधक उपाययोजनावर मार्गदर्शक सूचना

प्रत्येक राज्यांमध्ये उच्चतम पूर पातळी ठरविणे. प्रत्येक शहरामध्ये तांत्रिकदृष्ट्या सक्षम समन्वय अधिकाऱ्यासह (नोडल ऑफिसर ) नागरी पूर/ पूर व्यवस्थापन यंत्रणा स्थापित करणे. प्रत्येक शहराने खालील परिस्थिती विचारात घेऊन नागरी पूर व्यवस्थापन आणि उपसक्षम यासाठी प्रमाणित कार्यपद्धती (SOP) लागू करावी. किनारवर्ती शहरे, मुख्य/मोठ्या नदी किनाऱ्यावरील शहरे, धरणाजवळील/ जलाशयाजवळील शहरे, अंतर्गत शहरे, डोंगराळ प्रदेशातील शहरे, शहरांना वरीलप्रमाणे एक किंवा अनेक वैशिष्ट्ये असू शकतात.

नागरी पूर व्यवस्थापनासाठी सर्व भागीदारांची क्षमता बांधणी व उत्तम समन्वयासाठी मान्सूनपूर्व कार्यशाळेचे आयोजन करणे. माहिती जनसंपर्क आणि शिक्षण, प्रत्येक शहराने पूर्व तयारीसह स्थानिक कल्याणकारी प्राधिकारी किंवा अन्य समाज गटांची प्रभागनिहाय यादी तयार ठेवावी व संपूर्ण शहरासाठी त्याचे सहाय्य घेणे. मान्सूनचे आगमन होण्याच्या बऱ्याच कालावधीपूर्वी शहरातील जलाशयांच्या पाण्याचे शुद्धीकरण तसेच गटारांमधील गाळ प्रभावीपणे काढण्याची कार्यवाही पूर्ण करणे. प्रत्येक शहरातील पाण्याच्या साठ्यांच्या स्थितीचे व मालकी हक्काचे सूचीकरण व मॅपिंग (Mapping) करणे. शहरातील पूर परिस्थितीजन्य भागातील पाण्यावर उपसा करण्यासाठी पंप बसविणे. विमानतळ असणाऱ्या शहराच्या समन्वय अधिकाऱ्याने पावसाच्या सद्यस्थिती व भाकितासंबंधीच्या स्थितीबरोबरच चक्रीवादळ व अतिवृष्टीची माहिती भारतीय हवामान विभागाकडून (IMD) घेणे आवश्यक आहे.

ही माहिती METARS या संस्थेकडून दर 30 मिनिटांनी अद्ययावत करण्यात येते. जेव्हा चक्रीवादळ व अतिवृष्टीची स्थिती असते, तेव्हा ही माहिती महानगरपालिकेच्या आयुक्तांना तातडीने कळविणे गरजेचे असते. जेणेकरून ते सावधानता बाळगून त्यावर प्रतिबंधक उपाययोजना करतील. उदा. पूरग्रस्त व अतिवृष्टी क्षेत्रातील शाळा बंद करणे. जलाशयातून/धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय जागेवर घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक शहरासाठी पुरेसे अधिकार असणाऱ्या उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीची स्थापना करणे, सदर समितीला अतिवृष्टीच्यावेळी पाण्याच्या विसर्गाच्या भाकिताचा आढावा घेऊन जलाशयाची/धरणाची द्वारे उघडून पाण्याचा विसर्ग करण्याचे अंतिम अधिकार राहील. जलाशयातून/धरणातून पाण्याचा विसर्ग केला असता शेजारील राज्यांना ती माहिती त्याचवेळी देणे. प्रत्येक राज्य/जिल्हा प्राधिकरणाने धोका नकाशा तयार करणे गरजेचे आहे. जेणेकरून उपलब्ध साधनांचा पुरेपूर वापर करता येईल.

वज्राघात-काय करावे व काय करू नये

सतर्कतेची चिन्हे/ चेतावणी चिन्हे : अति वेगवान वारे, अति पर्जन्य आणि काळे ढग घोंगावणारे गडगडाटी वादळ, जवळचे झंझावात, जास्त किंवा अधिक प्रमाणात मेघगर्जना

वस्तुस्थिती - वीज ही सामान्यपणे उंच वस्तूंवर पडते. कोणतेही स्थान हे पूर्णपणे सुरक्षित नाही. काही स्थाने इतर ठिकाणापेक्षा सुरक्षित आहेत. मोठी बांधकामे छोट्या किंवा खुल्या बांधकामापेक्षा जास्त सुरक्षित असतात. जास्त पाऊस पडणाऱ्या क्षेत्राच्या बाहेरची वज्राघात होऊ शकतो. वज्राघात सतत एकाच ठिकाणी होऊ शकतो. सामान्यत: बाहेर पडलेल्या व्यक्तीच वज्राघातामुळे जखमी किंवा मृत्यू पावतात. वज्राघात बाधीत / जखमी व्यक्तिस तुम्ही मदत करू शकता त्याच्या शरीरात कुठल्याही प्रकाराचा विद्युत प्रवाह सुरु नसतो. त्या व्यक्तीस तत्काळ / त्वरीत मदत करावी.

काय करावे (Dos)

पूर्व तयारी

वज्राघातापासून बचावासाठी भित्तीचित्रे/भित्तीपत्रके प्रदर्शित करा. आपल्या भागातील स्थानिक हवामानाविषयी अंदाजाची व सतर्कतेच्या माहितीचे निरीक्षण करा. स्वत:साठी व कुटुंबासाठी वज्राघाताच्या आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवेसंदर्भात तसेच स्थानिक प्रशासकीय व स्थानिक आपात्‍कालीन सेवांचे संपर्क तपशील तयार करणे. आपत्कालीन साधने (Emergency Kit) तयार ठेवा. जर गडगडाटी वादळाचा/अतिवेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांचा अंदाज असेल तर घराबाहेर / घराबाहेरील क्रिया पुढे ढकलणे. विजेवर चालणाऱ्या वस्तू, इलेक्ट्रीक व इलेट्रीकल वस्तू आणि वातानुकुलीत यंत्रे बंद ठेवावेत. आपल्या घराच्या आजूबाजूच्या वाळलेले झाडे किंवा मृत झाडे फांद्या काढून टाकाव्यात.

तुमचा परिसरात वादळी वारे (गडगडाटी वारे)/विजा चमकत असल्यास

घरात असल्यास- घराच्या खिडक्या व दरवाजा बंद ठेवा. घराच्या दरवाजे, खिडक्या, कुंपणापासून दूर राहा. मेघगर्जना झाल्यापासून 30 मिनिटे घराच्या आतच रहावे.

घराबाहेर असल्यास- त्वरित सुरक्षित निवाऱ्याच्या ठिकाणाकडे (मजबूत इमरतीकडे) प्रस्थान करावे. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांच्यापासून दूर रहा. गाडी चालवत असल्यास, सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न करा. गाडी सुरक्षित ठिकाणी लावताना मोठ्या झाडांपासून तसेच पुराचे पाणी येत असल्यास अशी ठिकाणी वगळून लावाव्यात. खुल्या ठिकाणांपेक्षा सामान्यत: खिडक्या बंद असलेल्या, धातूपासून तयार झालेली वाहने (बस, मोटार) चांगली आश्रय स्थळे होऊ शकतात. उघड्यावर असल्यास, शेवटचा पर्याय म्हणून लगेच गुडघ्यांवर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यावर मध्ये झाकावे. जमिनीशी कमीत कमी संपर्क असावा. मोकळ्या तसेच लटकत्‍या विद्युत तारापासून दूर रहा. जंगलामध्ये दाट लहान झाडाखाली, उताराच्या जागेवर निवारा घ्यावा. इतर खुल्या जागांवर दरीसारख्या खोल जागेवर जाण्याचा प्रयत्न करा.( परंतू अचानक येणाऱ्या पुरापासून सावध रहा) जर जमिनीच्या वर पाणी आल्यास ताबडतोब सुरक्षित निवारा शाधून काढा.

वीज पडल्यास / वज्राघात झाल्यास- त्वरीत रूग्णवाहिका व वैद्यकीय मदत बोलवा. वज्राघात बाधित व्यक्तिस त्वरीत वैद्यकिय मदत मिळवून द्या. त्याला हात लावण्यास धोका नाही. ओल्या व थंड परिस्थितीत, इजळाला (बाधित व्यक्तिी) व जमिनीच्यामध्ये संरक्षणात्मक थर ठेवावा. जेणेकरून हायपोथरमीयाचा (hypothermia/ शरीराचे अति कमी तापमान) धोका कमी होईल.

खालीलप्रमाणे इजा झालेल्या इसमास हाताळा :

श्वसन बंद असल्यास- तोंडावाटे पुनरुत्थान ( Mouth to Mouth) प्रक्रिया अवलंबावी.

हृदयाचे ठोके बंद असल्यास- कुठलीही वैद्यकिय मदत मिळेपर्यंत रुग्णाची हृदय गती CPR चा वापर करून सुरू ठेवा.

इजाळाची/रुग्णाचा श्वास व सुरु नसल्यास- इतर दुखापतीसाठी/आघातांसाठी तपासणी. (भाजणे/ऐकू न येणे न दिसणे)

काय करू नये (Don’ts )

तयारी

गडगडाटीचे वादळ आल्यास, उंच जागांवर, टेकडीवर, मोकळ्या जागांवर समुद्र किनारी, स्वतंत्र झाडे रेल्वे/बस/सहलीची आश्रय स्थाने, दळणवळणीची टॉवर्स, ध्वजाचे खांब, विद्युत/दिव्याचे खांब, धातुचे कुंपण, उघडी वाहने आणि पाणी इत्यादी टाळावे.

घरात असल्यास- वायरद्वारे जोडले गेलेले फोन/मोबाईल व इतर इलेक्ट्रीक/इलेक्ट्रॉनिक उपकरणे विद्युत जोडणीस लावू नये, (अशा आपत्कालीनवेळी कॉर्डलेस व वायरलेस फोनचा वापर करावा परंतु ते भिंतीला जोडलेले नसावे) यादरम्यान आंघोळ करणे, हात धुणे, भांडी धुणे, ही कार्ये करु नयेत. क्राँक्रीटच्या (ठोस) जमिनीवर झोपू नये किंवा उभे राहू नये. प्रवाहकीय पृष्‍ठभागांशी संपर्क टाळावा (धातूची दारे, खिडक्यांची तावदाने, वायरिंग व प्लंबींग/नळ).

घराबाहेर असल्यास- मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडाजवळ उभे राहू नका. वाहनांच्या धातू किंवा विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. अधांतरी लटकणाऱ्या/लोंबकळणाऱ्या केबलपासून लांब रहा.

अधिक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षांशी संपर्क साधावा.

-संकलन- जिल्हा माहिती अधिकारी, पालघर.

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 10/16/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate