अल्पसंख्याक समाजातील होतकरू व हुशार मुलांना चांगले शिक्षण मिळावे, त्यांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात, यासाठी महाराष्ट्र शासन नेहमीच प्रयत्नशील राहत आले आहे. या समाजातील विद्यार्थांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळावे, यासाठी शासनाकडून मदत दिली जाते. प्रशिक्षणासाठीचे शुल्कही विद्यार्थ्यांना परत दिले जाते. यावर्षी 2014-15 साठी ही योजना सुरू झाली असून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या योजनेविषयी थोडक्यात माहिती...
अल्पसंख्याक मुस्लिम, शीख, बौद्ध, जैन, ख्रिश्चन व पारशी या समाजातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. या योजनेत निवड झालेल्या विद्यार्थ्याची शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम त्या विद्यार्थ्याच्या नावेच देण्यात येते.
शासकीय तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालयातील निरंतर प्रशिक्षण योजना, तंत्र शिक्षण परीक्षा मंडळ, मुक्त विद्यापीठ यांच्या मान्यतेने चालणाऱ्या विविध अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती म्हणून शुल्क किंवा 4 हजार रुपयांपैकी जी कमी रक्कम असेल एवढी रक्कम अदा करण्यात येते.
1) महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट कोर्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (एमएससीआयटी)
2) सर्टिफिकेट कोर्स इन फौंड्री टेक्नॉलॉजी
3) सर्टिफिकेट कोर्स इन फिलोक्सोग्राफिक प्रिंटिंग/ऑफसेट प्रिंटींग
4) सर्टिफिकेट कोर्स इन एम्बेडेड सिस्टीम 5) सर्टिफिकेट कोर्स इन एनर्जी मॅनेजमेंट अँड ऑडिट 6) कॉम्प्युटर हार्डवेअर मेन्टेनन्स 7) कॉम्प्युटर नेटवर्किंग 8) लॅपटॉप मेंन्टेनन्स 9) मोबाईल मेन्टेनन्स 10) फॅक्स/प्रिंटर/कॉम्प्युटर मेंन्टेनन्स 11) प्रोग्रॅमेबल लॉजिक कंट्रोलर (पीएलसी) 12) पी.सी.बी. डिझाईन 13) एएसपी नेट प्रोग्रॅमिंग
14) जावा/ ॲडव्हान्स जावा/सी प्रोग्रॅम इ. 15) कोरल ड्रॉ पेज मेकर/ फोटोशॉप इलस्ट्रेटर
16) ॲनिमेशन/ मल्टिमिडिया/ वेब डिझायनिंग 17) ऑटोकॅड/कॅटीया 18) एनएक्स -4 19) मॅटलॅब
20) बुक बाईंडिंग 21) ॲडव्हान्स ऑटोमोटीव कोर्स 22) एअरक्राफ्ट मेन्टेनन्स 23) फूट वेअर डिझाईन
24) अल्पमुदतीचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम - हॉटेल मॅनेजमेंट ॲड कॅटरिंग टेक्नॉलॉजी, ट्रॅव्हल अँड टुरिझम,
25) अल्पमुदतीचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम -ड्रेस डिझाईन अँड फॅशन टेक्नॉलॉजी
26) शासकीय कला महाविद्यालयातील अल्पमुदतीचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम
27) राज्य शासनाच्या अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र पदवी व पदविका संस्थांमधील अल्पमुदतीचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम इत्यादी.
योजनेत सहभागी होण्यासाठीचे वेळापत्रक
अ.क्र. |
कार्यसूची |
दिनांक |
1 |
नवीन संस्थांनी Online Registration No व Course चेApproval घेणे/ Online Registration No असलेल्या संस्थांनी सन 2014-15 साठी Course चे Approval घेणे |
09/12/2014 ते 09/02/2015 |
2 |
संस्थेने छाननी करून विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन भरणे व निश्चित करणे. |
09/12/2014 ते 05/03/2015 |
3 |
तंत्र शिक्षण संचालनालय, मुंबई यांच्याकडे अर्जाच्या प्रतीसोबतOnline Uploaded Report संस्थेच्या सही व शिक्क्यासह पाठविणे |
06/03/2015 ते 10/03/2015 |
4 |
संकेतस्थळावर तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे. |
13/03/2015 |
5 |
काही तक्रार असल्यास फॅक्स/ पत्र/ ईमेलद्वारे संस्था/ विद्यार्थ्यांनी संचालनालयास सादर करावयाचा अंतिम दिनांक (फॅक्स नं.022-22690007) |
16/03/2015 ते 20/03/2015 |
अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळावे, यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. या समाजातील युवकांनी याचा लाभ घेऊन प्रशिक्षित व्हावे, असे आवाहन तंत्र शिक्षण संचालनालयातर्फे करण्यात आले आहे. या योजनेची सविस्तर माहितीhttp://www.dtemaharashtra.gov.in/EOTP/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
लेखक -नंदकुमार वाघमारे,
माहिती अधिकारी, उप माहिती कार्यालय, शिर्डी
स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 7/4/2020
भारत हा कृषी प्रधान देश आहे. यासाठी कृषी विकासासाठ...
सदर योजना महाराष्ट्र राज्यात सन २००४-०५ पासून राबव...
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायत...
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कम ...