योजनेचा उद्देश अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत योजना राबविण्यात येतात. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव अनुसूचित जातीतील चर्मकार समाज. योजनेच्या प्रमुख अटी अर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा. अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षांपर्यत असावे. अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्याला असावा. ( अ) अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रु.९८०००/ व शहरी भागासाठी रु.१२००००/ पर्यंत असावे. (ब) राज्य शासन पुरस्कृत योजनांसाठी शहरी व ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा रु.१०००००/ पर्यंत असावे. जातीचा व उत्पन्नाचा दाखला तहसिलदार किंवा तत्सम सक्षम प्राधिकायाने दिलेला असावा. अर्जदाराने या महामंडळाकडून अथवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा. महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील. दिल्या जाणाया लाभाचे स्वरुप एनएसएफडीसी नवी दिल्ली यांच्या कर्ज योजने अंतर्गत सन २००९ या वर्षापासून शैक्षणिक कर्ज योजना राबविण्यात येत आहे. सदर योजने अंतर्गत शैक्षणिक कर्ज योजना राबविण्यात येत आहे. सदर योजने अंतर्गत शैक्षणिक कर्ज मर्यादर देशात शिक्षणसाठी रु.१० लाख व परदेशासाठी रु.२० लाख इतकी आहे. या कर्जावर ४ टक्के व्याजदर आकारण्यात येतो. अर्ज करण्याची पध्दत अर्जाचा नमुना महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात विनाशुल्क स्वरुपात उपलब्ध असेल. अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज भरुन संपूर्ण कागदपत्रांसह जिल्हा कार्यालयात अर्ज सादर करावयाचा आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, महाराष्ट्र सरकार