महाराष्ट्र राज्याचे नवीन व नवीकरण उर्जा स्त्रोत (अपारंपरिक उर्जा स्त्रोत ) यापासून वीज निर्मितीच्या पारेषण संलग्न प्रकल्पासाठी एकत्रीत धोरण २०१५. उद्दिष्ट सदर धोरणांतर्गत राज्यात पारेषण संलग्न असे खालील क्षमतेचे प्रकल्प स्थापन करण्याचे निश्चित करण्यात येत आहे ५००० मे. वॅट क्षमतेचे पवन ऊर्जेपासून वीज निर्मिती प्रकल्प १००० मे. वॅट क्षमतेचे उसाच्या चिपाडावर / कृषी अवशेषावर आधारित सह-वीज निर्मिती प्रकल्प ४०० मे. वॅट क्षमतेचे लघु जल विद्युत निर्मिती प्रकल्प ३०० मे. वॅट क्षमतेचे कृषीजन्य अवशेषावर आधारित वीज निर्मिती प्रकल्प २०० मे. वॅट क्षमतेचे औद्योगिक टाकाऊ पदार्थांपासून वीज निर्मिती प्रकल्प -७५०० मे. वॅट क्षमतेचे सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती प्रकल्प असे एकूण १४,४०० मे. वॅट क्षमतेचे नवीन व नवीकरण ऊर्जेपासून वीज निर्मितीचे पारेषण संलग्न प्रकल्प पुढील पाच वर्षामध्ये आस्थापित करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यासंबधीचा शासन निर्णय क्रमांक : अपाऊ-२०१५/प्र.क्र.४९/उर्जा -७, उद्योग, उर्जा व कामगार विभाग, महाराष्ट्र शासन, दिनांक : २० जुलै २०१५ शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा स्त्रोत : MEDA (महाऊर्जा) संकलन : छाया निक्रड