देशभरात निर्माण होणा-या वीजेच्या उत्पादनापैकी २०% वीज ही प्रकाश मिळविण्यासाठी वापरली जाते. देशातील बरीचशी प्रकाशऊर्जा ही इनकॅण्डेसेंट बल्बच्या म्हणजे पिवळा प्रकाश देणार्या दिव्याच्या माध्यमातून मिळवली जाते. यात प्रामुख्याने घरांचा समावेश आहे. इनकॅण्डेसेंट बल्ब अत्यंत अकार्यक्षम असतात कारण हे दिवे केवळ १०% च वीजेचे प्रकाशात रुपांतर करतात व उर्वरीत ९०% वीजेचे रुपांतर उष्णतेमध्ये करतात.
कॉम्पॅक्ट फ्ल्युरोसेंट लॅम्प म्हणजेच CFLचे दिवे इनकॅण्डेसेंट बल्बना उत्तम पर्याय आहे. CFLचे दिवे इनकॅण्डेसेंट बल्बच्या तुलनेत १/५ एवढीच वीज वापरतात आणि तेवढ्याच क्षमतेचा प्रकाश देतात. व्यापारी बाजारपेठेतही CFLने मोठी बाजी मारली आहे. २००३ मध्ये भारतात CFL चा खप २०० लाख इतका होता तो २००८ मध्ये २००० लाखांवर जाऊन पोहोचला. मात्र लाईटिंग असोशिएशनच्या आकडेवारीनुसार घरांमध्ये वापरल्या जाणा-या CFLच्या दिव्यांचे प्रमाण ५-१०% एवढेच आहे. याचे मुख्य कारण आहे ते त्यांची किंमत. एक CFL चा दिवा सामान्य बल्बपेक्षा ७-१० पटींनी महाग असतो.
असे म्हटले जाते की, भारतात आजमितीला सुमारे ४००० लाख इनकॅण्डेसेंट बल्ब वापरात आहेत. त्यांच्या जागी जर CFL चे दिवे वापरले गेले तर वीजेची मागणी १०००० मेगावॅटने कमी होईल.
बचत दिवा योजनेचे उद्दिष्ट्य हेच आहे. घरोघरी इनकॅण्डेसेंट बल्बएवढा प्रकाश देणारे CFL चे दिवे पुरवणे हा या योजनेमागील मुख्य हेतू आहे. ही योजना क्योटो प्रोटोकॉलच्या स्वच्छ विकास प्रणालीअंतर्गत राबवली जाणार आहे. ही योजना फेब्रुवारी २००९ मध्ये सुरु करण्यात आली.
ही योजना खाजगी व सार्वजनिक क्षेत्रांच्या सहकार्याने राबवली जाणार आहे. यामध्ये CFL चे दिवे तयार करणारे खाजगी उत्पादक व राज्याराज्यांमधील विद्युत वितरण महामंडळे यांचा समावेश आहे. CFL उत्पादक त्यांना ठरवून दिलेल्या विभागामध्ये १५ रुपयाला एक याप्रमाणे उच्च दर्जाचे CFL चे दिवे विकतील. CFL उत्पादक विद्युत वितरण महामंडळांच्या BEE या पॅनेलकडून ठरविले जातील. या योजनेनुसार केवळ ६० व १०० वॅटचे इनकॅण्डेसेंट बल्बच्या जागी अनुक्रमे ११-१५ व २०-२५ वॅटचे CFL चे दिवे विकले जातील. BEE या योजनेवर देखरेख ठेवेल.
प्रत्येक विद्युत वितरण महामंडळांच्या विभागात या योजनेअंतर्गत ५० लाख CFL चे दिवे विकले जातील अशी अपेक्षा आहे.
स्त्रोत: www.bee-india.nic.in
अंतिम सुधारित : 7/21/2020
एखाद्या खेड्याच्या राजस्व सीमेमध्ये, कोणत्याही कार...
ग्रामीण भागातील विजेच्या वाढत्या वापरामुळे या भागा...
दुर्गम भागातील खेड्यांच्या विद्युतीकरणाच्या कार्यक...
ऊर्जे विषयीच्या बातम्या