नवीन व नवीकरणीय ऊर्जा स्त्रोत (अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत) यापासून वीज निर्मितीच्या पारेषण संलग्न प्रकल्पांसाठी एकत्रित धोरण-2015 अंतर्गत प्रकल्प उभारणे विषयी कार्यपध्दती
महाराष्ट्र शासन
उद्योग, उर्जा व कामगार विभाग
शासन निर्णय क्रमांक अपाऊ-2015/प्र.क्र.49/भाग-8/ऊर्जा-7
मंत्रालय मुंबई -400 032,
दिनांक : 9 सप्टेंबर, 2015.
नवीन व नवीकरणीय ऊर्जा स्त्रोतांपासून वीज निर्मितीचे अनन्य साधारण महत्व लक्षात घेऊन वीज निर्मितीच्या पारेषण संलग्न प्रकल्पासाठी दिनांक 20 जुलै 2015 अन्वये एकत्रित अपारंपरीक ऊर्जा निर्मिती धोरण-2015 जाहीर केले आहे.
दिनांक 20/07/2015 रोजी जाहीर झालेल्या धोरणांतर्गत समाविष्ट पारेषण संलग्न प्रकल्पांसाठी स्त्रोतनिहाय सविस्तर कार्यपध्दती परिशिष्ट अ,ब,क,ड,ई व फ नुसार विहीत करण्यात येत आहे.
परिशिष्ट अ,ब,क,ड,ई व फ मध्ये नमूद प्रकल्पांची नोंदणी, मुलभूत सुविधा संमती, (ब,क,ड फ) पारेषण जोड शिफारस आणि धोरणातील सोयी-सवलतींसाठी प्रकल्प धारक / प्रकल्प विकासकाने महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाउर्जा), पुणे कार्यालयाकडे संपर्क साधावा.
पारेषण जोड संमती घेण्यासाठी प्रकल्प धारक / प्रकल्प विकासकाने महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी लि. मुंबई या कार्यालयाकडे संपर्क साधावा.
नवीन व नवीकरणीय ऊर्जा स्रोतांपासून वीज निर्मितीचे प्रकल्प अधिक संख्येने आस्थापित व्हावेत यादृष्ट्टीने महाराष्ट्र विद्युत आयोगाकडून खुला प्रवेश नियमावली (Open Access Regulation) स्वतंत्ररित्या जाहीर करण्यात येईल.
सदर ऊर्जा प्रकल्प प्रस्तावांसाठी आवश्यक असणाऱ्या विहित अर्जाचे नमुने महाउर्जा, पुणे, यांच्या www.mahaurja.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक 201509141334275810 असा आहे. हा आदेश डीजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
परिशीष्ट अ - पवन ऊर्जेपासून वीज निर्मिती प्रकल्पासाठी कार्यपद्धती
परिशीष्ट ब - ऊसाची चिपाडे / कृषी अवशेषांवर आधारीत सहवीज निर्मिती प्रकल्पासाठी कार्यपद्धती
परिशीष्ट क – लघु जल विद्युत निर्मिती प्रकल्पासाठी कार्यपद्धती
परिशीष्ट ड – कृषीजन्य अवशेषांपासून वीज निर्मिती प्रकल्पांसाठी कार्यपद्धती
परिशीष्ट इ – सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती प्रकल्पांसाठी कार्यपद्धती
परिशीष्ट फ – औद्योगिक टाकाऊ पदार्थापासून वीज निर्मिती प्रकल्पांसाठी कार्यपद्धती
सविस्तर शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
स्त्रोत : महाउर्जा
अंतिम सुधारित : 5/5/2020