অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लाल बोर

लाल बोर

लाल बोर

(क. सिमेयरनेल्ली; इं. वेस्ट इंडियन चेरी; लॅ. मालपीगीया प्युनिसिफोलिया; कुल-मालपीगीएसी) हे झुडूप वा लहान वृक्ष मूळचा उष्ण कटिबंधीय अमेरिकेतील व वेस्ट इंडीजमधील असून भारतात पुणे, मद्रास व म्हैसूर येथील बागांत लागवडीत आहे. यांची उंची सु. ८ मी. पर्यंत असते. पाने विविध आकारांची (गोलसर, हृदयाकृती इ.) असून गुलाबी, लहान फुलांचे झुबके जूनमध्ये येतात. अश्मगर्भी (आठळीयुक्त) फळ शेंदरी किंवा लाल, गोलसर, १-१.६ सेंमी. व्यासाचे व एकटे असते किंवा अनेकांचा झुबका असतो. ते जुलै-ऑगस्ट मध्ये पिकते व आंबट-गोड असल्याने विशेषेकरून मुलांना आवडते. त्यांचा मुरंबा किंवा सार करतात. विशेषतः कच्च्या फळात ॲस्कॉर्बिक अम्लाचे प्रमाण बरेच आधिक असते. फळात (८३% खाद्य भागात) जलांश ८३.९%, प्रथिन १.६%, स्निग्ध पदार्थ ०.१%, कार्बोहायड्रेटे १३.७%, धागा १.०%, राख ०.७% असते. शिवाय त्यात कॅल्शियम, लोह, कॅरोटीन, थायामीन, रिबोफ्लाविन, निॲसीन इ. असतात. या वनस्पतीची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨मालपीगीएसीमध्ये (माधवी कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात.

 

 

लेखक - ज. वि. जमदाडे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 8/4/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate