অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गुलूम

गुलूम

गुलूम

(क. गुलीमावू; लॅ. मॅकिलस मॅक्रँथा; कुल-लॉरेसी). हा मोठा २७ मी. उंच व ३ मी. घेर असलेला सदापर्णी वृक्ष कोकणच्या व उत्तर कर्नाटकाच्या गर्द जंगलात आढळतो. पाने साधी, एकांतरित (एकाआड एक), चिवट, लांबट, गोलाकृती,वरून चकचकीत व खालून निळसर असतात. साल फिकट पिंगट व खरबरीत असते; फुले लहान, पिवळट व फांद्यांच्या टोकास, पांढऱ्या लवीने आच्छादलेली, परिमंजरीवर डिसेंबर ते मार्चमध्ये येतात. परिदले रेशमी व लोमश (केसाळ) [→ फूल]; मृदुफळ गोलसर, लहान, गुळगुळीत, गर्द हिरवे व त्यावर पांढरे ठिपके असून ते शेवटी काळे होते. साल क्षय, दमा व संधिवात यांवर उपयुक्त; पाने व्रणांवर लावतात. लाकूड प्रथम भुरकट नारिंगी नंतर तपकिरी, मध्यम कठीण व टिकाऊ असून घरबांधणी, होड्या व नावा यांकरिता वापरतात. चहाची खोकी, कपाटाच्या फळ्या, लहान चौकटी, आगकाड्या, रेल्वे स्लीपर्स (रुळांच्या खाली आधाराकरिता वापरण्यात येणारे ओंडके) इत्यादींकरिताही उपयुक्त आहे. खोडाचे मोठे तुकडे सावलीत लावून नवीन लागवड होते.

 

पहा : लॉरेसी.

ठाकूर, अ. ना.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate