बाणगंगा हे राजस्थानमधील विराटनगर ब्लॉकमधील एक गाव आहे. या गावामध्ये भूजलाचा प्रचंड उपसा आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये होणारी जंगलतोड हीदेखील एक समस्या आहे. शेकडो एकरांची जमीन पडीक असल्याने येथे पावसाचे प्रमाणदेखील कमी होत चालले आहे.
बाणगंगा गावातील बहुतांश लोक शेतीवरच आपला उदरनिर्वाह करतात. या गावात वीज महामंडळाकडून मिळणारी वीज नाही. त्यामुळे सूर्यास्त झाल्यावर गावातील लोकांना सर्व कामे केरोसिनच्या दिव्यांच्या उजेडात करावी लागतात. या दिव्यांमधून निघणारा धुरामुळे येथील लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे शिवाय सतत अंधुक प्रकाशात वावरल्यामुळे त्यांची नजरदेखील कमजोर पडत चालली आहे.
"लाखोंचे आयुष्य उजळू या" ही योजना राबवायला सुरूवत झाल्यापासुन बाणगंगामधील परिस्थिती हळूहळू सुधारली. या योजनेमुळे लोकांना स्वच्छ आणि जास्त तीव्रतेचा प्रकाश मिळू लागला. या दिव्यांची मागणी इतकी आहे की गावातील सर्व दिवे लगेच भाड्याने दिले जातात.
दिव्यांमुळे बाणगंगामधील सुमारे १०० घरांचे राहणीमान उंचावण्यास मदत झाली आहे. या दिव्यांचा वापर मुख्यत्वे घरगुती कामांसाठी केला जातो. या दिव्यांमुळे आता विद्यार्थी रात्री उशीरापर्यंत अभ्यास करू शकतात. या दिव्यांमुळे गावातील स्त्रियांनादेखील आता सूर्यास्तानंतर घरबसल्या काम करून चार पैसे कमवण्याची संधी मिळाली आहे. या दिव्यांमुळे घरात होणारे प्रदूषणदेखील कमी झाले आहे आणि याचा परिणाम म्हणून गावक-यांचे, खासकरून स्त्रिया आणि मुलांचे आरोग्यदेखील सुधारले आहे.
रात्री घरात व्यवस्थित प्र्काशाची सोय झाल्यामुळे आता घरांमध्ये टोपल्या बनविणे, झाडू बनविणे, भाज्या साठविणे अशा नवनव्या उद्योगांना चालना मिळाली आहे. या दिव्यांमुळे आता गावातील दुकाने आणि बाजारदेखील उशीरापर्यंत उघडे राहू लागले आहेत.
या योजनेतील भागीदार 'ह्युमन पीपल टू पीपल इंडिया' ही संस्था आता गावात स्वयंमदत गट चालविते. गावात दिवे आल्यामुळेच आपण आपला दिवसभरातील जास्तीत जास्त वेळ वस्तू उत्पादनाला देऊ शकतो आणि स्वयंमदत गटाद्वारे अधिक उत्पन्न मिळवू शकतो असा या गटांच्या सदस्यांचा ठाम विश्वास आहे. हे सर्व गट आता एकत्र येऊन त्यांची बँक स्थापन करणार आहेत जेणेकरून ते आपल्याच गावातील सदस्यांना लहान लहान कर्जे देऊ शकतील.
श्रीमती गोटीदेवी गावातील चार्जिंग स्टेशन चालवितात. आपल्या कामाचा त्यांना सार्थ अभिमान आहे. त्या म्हणतात की चार्जिंग स्टेशन सांभाळत असल्यामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला गावात बराच मान आहे. स्टेशनची तांत्रिक व्यवस्था ठेवणे आणि भाड्याने नेलेले दिवे वेळेवर परत आणणे या कामी त्यांना त्यांचा मुलगा ओमी याची मदत होते.
स्त्रोत: http://labl.teriin.org
अंतिम सुधारित : 1/30/2020
गावांमध्ये सुयोग्य तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी...
लोकहितासाठी ज्याचा आदर्श भारतातील गावे व खेडी घेऊ ...
महातबेरा हे भारताच्या झारखंड राज्यातील एक छोटेसे ...