मी एका खेडेगावात राहत आहे. नुकतेच मला पंचायत समिती जाफ्राबाद येथुन एका योजनेअंतर्गत बायोगँस उभारणीसाठी अनुदान मिळाले. या अनुदानाचा वापर करुन माझ्या घराजवळ बायोगँस संयंत्राची उभारणी केली. आमच्या भागात लाकुडफाटा व जनावरांचे शेण हेच इंधन आहे.आता लाकुड्फाटा दुर्मिळ होत चालला आहे. शेती संवर्धनात खताचे महत्व वाढ्ल्याने शेण जाळणे परवडत नाहि. त्यामुळे माझ्या मनात विचार आला कि शेणापासुन बायोगँस बनवुन तो वापरणे योग्य ठरेल.तसेच मी असे ऐकले होते की बायोगँस संयंत्र गुणवत्ता असलेले खत बनविते आणि स्वच्छ इंधन मिळते. तसेच मुलमुत्राचे नियंत्रण करता येते. यामध्ये 70 ते 75 % शेणाचे संधारण केले जाते. प्रक्रियायुक्त स्लरीचा पिकाच्या वाढीसाठी सुक्ष्म अन्नद्रव्य म्ह्णुन उपयोग होतो. बायोगँसमुळे माझे पैसे वाचले कारण या गँसचा स्वयंपाकासाठी इंधन म्ह्णुन चांगला वापर झाला.
बायोगँसमुळे लाकुडफाटा तोडुन जाळणे मी बंद केले आहे. यामुळे धुर तयार होत नाही आरोग्यही चांगले राहते. पर्यावरण संतुलीत राहण्यास मदत झाली.
रा. तपोवन गो. ता. जाफ्राबाद जि. जालना
अंतिम सुधारित : 6/28/2020
कॉम्पॅक्ट फ्लूरोसंट लाइट ऊर्फ सीएफ्एल प्रकारचे दिव...
एलपीजी हे स्वयंपाकासाठी एक अत्यंत सुरक्षित, स्वस्त...
कॉम्पॅक्ट फ्लूरोसंट लाइट ऊर्फ सीएफ्एल प्रकारचे दिव...
पावसाच्या पाण्याची साठवण म्हणजे घरांच्या छपरांवर प...