पवन ऊर्जेची उपलब्धता वाढवणे शक्य
अपारंपरिक ऊर्जा स्रोतापासून वीज उपलब्धी वाढवणे, त्याचा वापर करणे यासाठी जगभरामध्ये सातत्याने संशोधन केले जात आहे. अपारंपरिक ऊर्जेतील महत्त्वाची ऊर्जा पवन ऊर्जा आहे. त्याच्या साह्याने अधिक प्रमाणात वीज मिळवण्यासाठी अमेरिकेतील आयोवा राज्य विद्यापीठामध्ये संशोधन केले जात आहे.