कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर वस्तू आणि सेवा कर कायद्यांतर्गत करभरणा करणाऱ्यांसाठी सरकारकडून दिलासा योजना जाहीर
सर्व देशभर कोविड -19 महामारीच्या उसळलेल्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कायद्यांतर्गत वैधानिक व नियामक पालन करण्याच्या बाबतीत करदात्यांना आलेले आव्हान लक्षात घेता, सरकारने 1 मे 2021 रोजी सर्व दिलासा योजनांच्या अधिसूचना जारी केल्या आहेत.