सर्वप्रथम व्यक्तिगत आणि कौटुंबिक पातळीवर याबद्दल जाणीव निर्माण करायला पाहिजे; कारण तिथूनच व्यवस्थापनाला सुरुवात करायची आहे. हे झाले नाहीतर सार्वजनिक यंत्रणा (ग्रामपंचायत, नगरपालिका) काही करू शकणार नाही.
यापुढची पायरी म्हणजे गाव-नगर पातळीवर घन कचरा व्यवस्थापनाचे नियोजन . कचरा वर्गीकरण,जमा करून आणणे, विल्हेवाट, विक्री इ. सर्व घटकांचा विचार व्हायला पाहिजे. यात अनेक संस्था, गट सहभागी झाले तर हे काम यशस्वी होऊ शकते.संपूर्ण स्वच्छता अभियानासाठी मिळणा-या निधीच्या एकूण दहा टक्के रक्कम घनकचरा व्यवस्थापनासाठी वापरता येईल.
काही घनकचरा सार्वजनिक जागीही निर्माण होतो. दुकाने, आठवडे बाजार, शाळा, मंदिरे,यात्रा, लग्नसमारंभ इ. ठिकाणी पण पुष्कळ कचरा निर्माण होतो. या सर्व घटकांचा विचारही व्यवस्थापनात करावा लागेल.
न कुजणारा किंवा सुका कचरा साधारणत: जमीन किंवा रस्ता भरण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
कुजणा-या कच-याचा उपयोग करून आपण कंपोस्ट खत किंवा गांडुळखत तयार करु शकतो.
सर्व व्यवस्थापनाची सुरुवात घराघरातच सुरु व्हायला पाहिजे. घनकच-याचं व्यवस्थापन करण्यासाठी घनकचरा वेगळा करणे महत्त्वाचे आहे. घनकचरा वेगळा करण्यासाठी खालीलप्रमाणे वेगवेगळा रंग असणा-या कचरा कुंडयांचा वापर केला जाऊ शकतो.
1. सफेद : पुन्हा वापरता येण्याजोगा कचरा
2. हिरवा : कुजणारा/ओला कचरा
3. काळा : न कुजणारा / सुका कचरा
पहिल्याप्रथम या कच-याची वर्गवारी केली पाहिजे. यातून कुजणारा कचरा घरच्या घरी कुजवून खत करता येते. उरलेला कचरा सार्वजनिक व्यवस्थेने उचलावा. घरातील कच-याच्या वर्गवारीसाठी निरनिराळया रंगाचे डबे/बादल्या वापराव्यात.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
करडांच्या शरीरस्वास्थ्य सुयोग्य राखण्यासाठी सकस आह...
यवतमाळची ओळख आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून सर्वदूर...
विशेषत: हवामानातील बदलामुळे नैसर्गिक आपत्तीत आकस्म...
थंडी संपतेवेळी येणाऱ्या आंबिया बहाराचे व्यवस्थापन ...