অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मानसोपचार

मानसोपचार

सर्वसाधारणपणे मानसोपचार म्हणजे मानसिक विकारांचा उपचार; परंतु मानसचिकित्सा क्षेत्रातील व्याख्येनुसार, मानसिक विकारांचा, मानसशास्त्रीय पद्धतीने केलेला उपचार असा अर्थ होतो. कारण इतर अनेक उपचारपद्धती आहेत. उदा., मानसौषधी, भौतिक-शारीरिक उपचार, मानसशल्यचिकित्सा वगैरे. मानसोपचारासाठी उपचारज्ञ व रुग्ण यांचा उत्कट व दीर्घ संवाद अनेक बैठकीत चालतो.

यशस्वी उपचारासाठी दोघांत एक विशेष नाते (स्नेहबंध) निर्माण व्हावे लागते; त्यामुळे रुग्ण उपचारज्ञावर पूर्ण श्रद्धा ठेवतो व उपचारज्ञ रुग्णविषयी जबाबदार आस्था बाळगतो. ह्या मानसशास्त्रीय प्रक्रियेत, उपचारज्ञ हा समन्वेषण, पृथक्करण, विवरण, आश्वासन, सूचन, मार्गदर्शन, आधारदान व पुनर्शिक्षण ह्या मनोव्यापारांचा वापर करतो. मानसोपचार बहुधा मज्जाविकृती, व्यक्तिमत्त्व विकार, प्रासंगिक ताणप्रतिक्रिया, सौम्य कार्यिक चित्तविकृती आणि मनोशारीरिक विकार जडलेल्या रुग्णांना दिला जातो.

 

लेखक : र. वै. शिरवैकर

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/27/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate