मानसिक आरोग्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांसाठी सूचना
मानसिक आरोग्याच्या दृष्टीने गावपातळीवरच्या कार्यकर्त्यांसाठी दहा सूचना
लक्षात ठेवा : ही माणसे मनोरुग्ण असू शकतील
- निरर्थक बोलणा-या, विक्षिप्त वागणा-या व्यक्ती,
- खूप वेळ व अवाजवी शांत राहणा-या, इतरांशी मिळून मिसळून न वागणा-या अबोल व्यक्ती,
- इतर लोक ऐकू व पाहू न शकणा-या गोष्टींचा ज्यांना भास होत असेल अशा व्यक्ती,
- अतिसंशयी, सतत कपटकारस्थानाची चाहूल घेणा-या व्यक्ती,
- अतिशय 'हवेत' बोलणा-या व वागणा-या, बढाया मारणा-या, अवास्तव हास्यविनोद करणा-या व्यक्ती,
- सतत अतिदुःखी व रडत राहणा-या व्यक्ती,
- आत्महत्येचा विचार बोलून दाखवणा-या किंवा प्रयत्न करणा-या व्यक्ती,
- अंगात येणा-या व्यक्ती,
- झटके, बेशुध्दी येऊन खाली पडणा-या व्यक्ती,
- मंद, अलिप्त दिसणा-या, अपरिपक्व वाटणा-या व्यक्ती.
अशा व्यक्ती आढळल्यास त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे, डॉक्टरकडे पाठवण्याचा प्रयत्न करा, कुटुंबीयांना सावध करा व संयमाने शेवटपर्यंत पाठपुरावा करा.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 6/6/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.