प्रस्तावना
विषबाधा होणे म्हणजे - विष किंवा विषारी पदार्थ म्हणजे एक असा पदार्थ ज्याचा आपल्या शरीरात प्रवेश होणे. विषबाधेचा शरिरावर गंभीर परिणाम होउ शकतात किंवा मृत्यू देखील ओढवू शकतो. विषाचा प्रवेश आपल्या शरीरात तीन प्रकारे होऊ शकतो-
- श्वासावाटे
- त्वचेमधून
- तोंडावाटे
श्वासावाटे / तोंडातून होणारी विषबाधा
श्वासावाटे होणारी विषबाधा हि सर्वात जास्त गंभिर होउ शकते. त्यानंतर तोंडाद्वारे आणि त्वचीद्वारी होणारी विषबाधा विष हे चुकून घेतले असो किंवा मुद्दाम घेतलेली असोत शेवटी परिणाम सारखेच असतात. काही शेतकर्याना कीटकनाशकांशी संपर्क आल्यानेही विषबाधा होऊ शकते त्यावरील ऊपाय त्या किटकनाशकांबरोबर दिलेला असतो. बरेचदा विषबाधा चुकून म्हणजे अपघातानेच होतो आणि म्हणूनच हे टाळण्यासाठी पुरेशी काळजी घेतली पाहिजे.
विषबाधा होउ नये यासाठी ह्या गोष्टी करणे टाळा
- सर्वांत महत्वाचे म्हणजे औषधांच्या गोळ्या किंवा औषधे मुलांच्या हाती लागतील अशा ठिकाणी कधीही ठेवू नका. ती नेहमी कुलुपबंद कपाटात व त्यातही उंचावरील कप्प्यांत ठेवा.
- औषधे किंवा औषधी गोळ्या दीर्घकाळ साठवून ठेवू नका कार त्या मुदतीनंतर खराब होतात. औषधाचा कोर्स संपल्यानंतरची शिल्लक औषधे दुकानदारास परत करा किंवा सरळ संडासात टाकून द्या.
- औषधे कधीही अंधारात, न बघता किंवा लेबल न वाचता घेऊ तसेच देऊ नका.
- घातक रसायने किंवा औषधे शीतपेयांच्या किंवा सरबतांच्या बाटल्यांमध्ये साठवून ठेवू नका. मुले त्यांना सरबत समजून हमखास पितात.
- घरात रांगते मूल असल्यास मोरी साफ करण्याचा साबण इ. वस्तू वॉशबेसिनखालच्या जागेत कधीही ठेवू नका (जाताजाता सांगायची गोष्ट म्हणजे मोरी धुण्याचा साबण आणि डाग घालवणारी रसायने एकत्र आल्यास विषारी वायू तयार होतो)
- विषप्रयोग झालेल्या व्यक्तीला उलटी करवू नका तसेच खारे पाणी देऊ नका.
- अशा व्यक्तीस तोंडावाटे काहीही देऊ नका.
- अशी व्यक्ती बेशुद्ध असल्यास तिला तोंडावाटे काहीही देऊ नका.
- पेट्रोल किंवा त्याच्याशी संबंधित पदार्थाने विषप्रयोग झालेल्या व्यक्तीस उलटी होण्यची वाट पाहात थांबू नका. तिला सुरुवातीपासूनच छातीपेक्षा डोके खालच्या पातळीत राहील अशातर्हेने झोपवा.
- औषधी गोळ्या - विशेषतः झोपेच्या गोळ्या - मद्याबरोबर कधीही देऊ किंवा घेऊ नका. ह्यामुळे जीवघेणा विषप्रयोग होऊ शकतो.
नेहमी आढळणारी विषबाधा पुढिल कारणानी होते
आपल्या दैनंदिन जीवनात आढळणारे काही विषारी पदार्थ असे -.
- फळे आणि फळांच्या बिया
- बुरशी
- खराब झालेले अन्न
- संहत रसायने पॅराफिन, पेट्रोलयुक्त ब्लीच, खते आणि कीटकनाशके
- अस्प्रिन, झोपेच्या गोळ्या, वेदनाशामक गोळ्या, लोहाच्या गोळ्या
- उंदीर मारण्याचे औषध
- मद्य
- हिरवे म्हणजे कच्चे बटाटे (कच्चे बटाटे खाणे किती धोकादायक असू शकते हे बर्याचजणांना माहीत नसते - त्यामुळे आंत्रशूळ, उलट्या आणि अतिसार होऊन प्रकृती पूर्णपणे ढासळू शकते)
यासाठी सर्वसाधारण उपाययोजना (प्रथमोपचार)
विषग्रस्त व्यक्ती बेशुद्ध असेल किंवा नसेलही - बेशुद्ध नसल्यास उत्तम, कारण ती उपाययोजनेमध्ये थोडीतरी मदत करू शकते.
- पोटात काय गेले आहे, किती आणि केव्हा हे माहीत करून घेण्याचा प्रयत्न करा
- अशा व्यक्तीच्या आसपास औषधी गोळ्यांचे कागद किंवा रिकामे डबे इ. पडले असल्यास ते दवाखान्यात दाखवण्यासाठी उचलून घ्या. म्हणजे घेतल्या गेलेल्या विषाचा प्रकार समजू शकेल. व्यक्तीचे तोंड तपासा. तोंडात जळल्याच्या, भाजल्याच्या खुणा असल्या आणि अन्न गिळणे शक्य असल्यास शक्यतितके जास्त दूध किंवा पाणी द्या.
- अशा व्यक्तीला उलटी झाल्यास ती ऊलटी प्लास्टिकच्या पिशवीत किंवा चिनीमातीच्या भांड्यात साठविण्याचा प्रयत्न करा. दवाखान्यात दाखवण्यासाठी त्याचा उपयोग होईल.
- विषग्रस्त व्यक्तीस शक्यतितक्या लवकर दवाखान्यात न्या. ती बेशुद्ध असल्यास किंवा वाटेतच बेशुद्ध झाल्यास ही काळजी घ्या -
- प्रथम श्वास तपासा. श्वसन चालू नसल्यास तोंडावाटे श्वास द्या. मात्र अशा व्यक्तीचे तोंड भाजले असल्यास यंत्रावाटे श्वसन द्यावे लागेल.
- श्वास चालू असल्यास तिला विशिष्ट स्थितीमध्ये, शरीरापेक्षा पाय किंचित वर ठेवून झोपवा (अगदी लहान मूल असल्यास आपण त्याला मांडीवर, डोके खालच्या पातळीत येईल अशारीतीने, झोपवू शकतो)
- बहुसंख्य विषांमुळे श्वसन थांबण्याचा धोका असतो त्यामुळे श्वासाकडे नीट लक्ष द्या.
- तिला शक्यतितक्या लवकर दवाखान्यात न्या.
- तिचे शरीर थंड ठेवण्याचा प्रयत्न करा - कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवा. कापडावर थंड पाणी घेऊन मान, पाठ व हातपाय चोळा.
- तिला शक्यतितके थंड पाणी किंवा तसेच काही पिण्यास द्या.
- तिला आकडी किंवा फिट येत नाही ना हे पहा
- व्यक्ती बेशुद्ध झाल्यास तिला वर सांगितल्याप्रमाणे विशिष्ट स्थितीत झोपवा.
- विषारी पदार्थाचा मूळ डबा किंवा बाटली जपून ठेवा कारण साधारणपणे त्यावरच विषावरील उतारा छापलेला असतो. आपल्या डॉक्टरांनीही ते पाहणे गरजेचे आहे.
त्वचेतून होणारी विषबाधा
सध्या रोपवाटिकांमध्ये तसेच शेतकर्यांद्वारे वापरल्या जाणार्या अनेक कीटकनाशकांमध्ये मॅलेथिऑनसारखी घातक रसायने असतात जी आपल्या त्वचेच्या संपर्कात आल्यास शरीरात शिरून भयंकर परिणाम घडवू शकतात.
त्वचीतून खालील कारणाने विषबाधा होऊ शकते
- कीटकनाशकांशी झालेला प्रत्यक्ष संपर्क
- अंग थरथर कापणे, आकडी किंवा फिट येणे
- व्यक्तीचा बेशुद्धावस्थेकडे होणारा प्रवास
काळजी कशी घ्याल (प्रथमोपचार)
संपर्क झालेली जागा भरपूर थंड पाण्याने नीट धुवा
कपड्यांना संपर्क झाला असल्यास ते काळजीपूर्वक काढा मात्र हे करताना स्वतःच संपर्कात येऊ नका!
त्या व्यक्तीस धीर द्या व शांत झोपवून ठेवा
तिला शक्यतितक्या लवकर दवाखान्यात न्या.
- तिचे शरीर थंड ठेवण्याचा प्रयत्न करा - कपाळावर थंड पाण्यची पट्टी ठेवा. कापडावर थंड पाणी घेऊन मान, पाठ व हातपाय चोळा.
- तिला शक्यतितके थंड पाणी किंवा तसेच काही पिण्यास द्या
- तिला आकडी किंवा फिट येत नाही ना हे पहा
- व्यक्ती बेशुद्ध झाल्यास तिला वर सांगितल्याप्रमाणे विशिष्ट स्थितीत झोपवा.
- विषारी पदार्थाचा मूळ डबा किंवा बाटली जपून ठेवा कारण साधारणपणे त्यावरच विषावरील उतारा छापलेला असतो. आपल्या डॉक्टरांनीही ते पाहणे गरजेचे आहे.
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम अंतिम सुधारित : 6/5/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.