অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लहान मुलांचे आजार - मुडदूस

लहान मुलांचे आजार - मुडदूस

मुडदूस

‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे लहान मुलांमध्ये दिसणारा आजार म्हणजे मुडदूस होय. हाडांमध्ये चुन्याचे क्षार जमून हाडे मजबूत होण्यासाठी ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता असल्यामुळे हाडे ठिसूळ व मऊ बनतात.

लक्षणे

  • कपाळ पुढे आलेले दिसते.
  • विकास हळूहळू होत असतो.
  • सांध्यांच्या बाजूच्या हाडांची टोक फुगतात.
  • सांधे सुजल्यासारखे दिसतात.
  • छातीच्या फासळ्या व पायांना बाक येतो.
  • पोट मोठे दिसते.
  • टाळू नीट भरलेली दिसून येत नाही.

उपचार

बाळाला कोवळ्या उन्हात १०-१५ मिनिटे ठेवल्यास ‘ड’ जीवनसत्वाची गरज भागते. कारण त्वचा/कातडी सूर्यप्रकाशाच्या मदतीने ‘ड’ जीवनसत्व तयार करते. भरपूर दूध, माशाचे तेल, अंडी, मांस इत्यादी गोष्टी खाव्यात/खायला दयाव्यात.

 

स्त्रोत : बालसंगोपन, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट

अंतिम सुधारित : 6/14/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate