অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जन्मलेल्या बाळाची काळजी

जन्मलेल्या बाळाची काळजी

बाळाचे डोके बाहेर आल्यावर पूर्ण बाहेर येण्याची वाट न पहाता बाळाचा श्वसनमार्ग साफ करावा.

  1. बाळ उलटे धरु नका.
  2. बाळावर पाणी मारु नका.
  3. बाळाचे नाक, तोंड घसा म्यूकस नळीने साफ करावे. म्यूकस नळी नसल्यास स्वच्छ मऊ सुती कपडा करंगळीला गुंडाळून बाळाच्या घशातून बोट फिरवून चिकटा काढून टाकावा.
  4. बाळ बाहेर येऊन, नाळेतील नाडी तपासून ती थांबल्यावरच नाळ कापावी.
  5. तोपर्यंत बाळ लगेच कोरडे करावे. लगोलग उबदार कपडयात गुंडाळून ठेवावे.
  6. बाळाला आंघोळ घालण्याची घाई करू नये.
  7. यानंतरही बाळ न रडल्यास अम्बू बॅग व मास्क वापरून कृत्रिम श्वास द्यावा. बॅग व मास्क नसेल तर बाळाच्या नाक व तोंडावर पातळ कपडा घालावा. आपल्या तोंडाने बाळाच्या नाकातोंडात आपले गाल फुगवून हलके फुंकर घालावी. फुंकताना फक्त आपल्या गालातलीच हवा द्यावी. छातीतली नाही.1 मिनिटामध्ये 10 ते 15 वेळा फुंकर द्यावी.
  8. या सर्व क्रिया करताना बाळ उबदार राहील याची काळजी घ्या. पेटती शेगडी खोलीत ठेवली तर उपयोग होईल. याऐवजी 100 वॅटचा दिवा लावणे चांगले.
  9. नाळ निर्जंतुक दो-याने बांधा. हल्ली निर्जंतुक दोरा बंद पाकिटात मिळतो. प्राथमिक आरोग्यकेंद्राकडे चौकशी करा. तयार दोरा नसेल तर साधा दोरा 20मिनिटे आधीच उकळून घ्या. ज्या कात्रीने नाळ कापायची तीही २० मिनिटे आधीच उकळून ठेवावी. नाळ स्वच्छ फडक्याने बांधून घ्या. निर्जंतुक बँडेजपट्टी चांगली. हे नसेल तर नाळेच्या टोकाला आयोडिन लावून तशीच उघडी ठेवली तरी चालते.
  10. बाळाचे डोळे स्वच्छ फडक्याने पुसून घ्या. उपलब्ध असल्यास डोळयात जंतुनाशक थेंब (टेट्रा) टाका.
  11. बाळाला स्वच्छ कोरडे करा व स्वच्छ सुती फडक्यात गुंडाळून ठेवा. थंडीचे दिवस असतील तर गरम राहील इतके पांघरूण वापरा. विशेषतः अपु-या दिवसांच्या बाळासाठी जास्त काळजी घ्यावी लागते. पांढरा थर खरडून काढू नये. तेल लावून साफ केल्यावर हळू हळू आपोआप निघेल.
  12. पहिल्यापासूनच बाळाला अंगावर पाजायला सांगा. दूध जरी लगेच आले नाही तरी असे केल्याने पान्हा फुटण्यास मदत होते. पहिला चीक जंतुरोधक असतो. तो वाया जाऊ देऊ नका. ब-याच ठिकाणी पहिले तीन दिवस बाळाला अंगावर न पाजण्याची पध्दत आहे, ती चुकीची आहे.
  13. बाळाला सुरुवातीला पातळ, चिकट, हिरवट, काळी शी होते. ती लगेच ओल्या फडक्याने साफ करून घ्या. बाळाच्या अंगावर शी वाळली तर ती काढताना नाजुक त्वचेवर जखमा होतात.
  14. बाळास काही व्यंग नाही याची तपासणी करून घ्या

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर

(MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate