অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

महिला आरोग्य अभियान

डॉ.आनंदीबाई जोशी - सन 1865 मध्ये कर्मठ ब्राम्हण कुटुंबात जन्मलेल्या आनंदी जोशी. त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षी तो ही त्यांच्या वयाच्या तिप्पट वयाच्या व्यक्तीशी झाला. ज्या काळी स्त्री शिक्षणच नाही तर स्त्रियांनी घराबाहेर पडणेही निषिद्ध मानलं जात होतं, त्यावेळी सातासमुद्रापार जाऊन ज्यांनी वैद्यकीय शिक्षण पुर्ण केलं त्या डॉ.आनंदीबाई जोशी. महाराष्ट्रातील आणि भारतातीलही पहिल्या महिला डॉक्टर. आजही समाजात डॉक्टरांची कमतरता जाणवते. त्यातही महिला डॉक्टरांची संख्या अत्यल्प आहे. म्हणूनच डॉ.आनंदीबाई जोशी यांचे कार्य प्रेरणादायी ठरावे. 26 फेब्रुवारी हा त्यांचा स्मृतीदिन.

जागतिक महिला दिन

8 मार्च हा जगभर जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. स्त्रियांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, निर्णय प्रक्रियेत स्त्रियांना सहभाग घेता यावा, स्त्रियांवरील अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार कमी व्हावा, स्त्रियांचे आरोग्यमान उंचावावे या सर्व समस्यांप्रती स्त्रियांमध्ये व एकूणच समाजामध्ये जनजागृती व्हावी हा जागतिक महिला दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश.

महिला आरोग्य अभियान

वरील दोन्ही दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने दिनांक 26 फेब्रुवारी 2015 ते 12 मार्च 2015 हा पंधरवडा महिला आरोग्य अभियान म्हणून राबविण्याचे निश्चित केले आहे.

महिला आरोग्य

निरोगी महाराष्ट्र हा सार्वजनिक आरोग्य विभागाचा संकल्प आहे. समाजातील रुढी, परंपरा, अंधश्रध्दा, वैद्यकीय सुविधांचा अभाव व वैयक्तिक आरोग्याकडे दुर्लक्ष इत्यादी कारणांमुळे महिला आरोग्य दृष्ट्या जोखीम गटात मोडतात. मधुमेह रोगाचे प्रमाण अलिकडे वाढत असल्याचे आढळून येते. तसेच स्त्रियांमधील कर्करोग ही सुध्दा एक सार्वजनिक आरोग्याची समस्या बनली आहे. ग्रामीण महिलांमध्ये रक्तक्षय नेहमीच आढळून येते. मधुमेह, कर्करोग, रक्तक्षय अशा असंसर्गजन्य आजारांबद्दल जनजागृती व्हावी व अशा संशयीत महिलांचे रोगनिदान होऊन त्यांच्यावर त्वरीत उपचार करता यावेत यासाठीच महिला आरोग्य अभियानाचे नियोजन केले आहे.

कर्करोगासंबंधी माहिती

सर्वसामान्य कर्करोग -कर्करोग हा 100 हून अधिक भिन्न आणि स्पष्ट रोगांचा एक गट आहे. कर्करोगाची सामान्य लक्षणे म्हणजे थकवा. अकारण वजन कमी होणे. सतत ताप येणे. मलविसर्जन प्रक्रियेत बदल. असामान्य रक्तस्त्राव किंवा स्त्राव घटृ होणे किंवा गुठळ्या होणे.

  • स्त्रियांमधील सर्वसामान्य कर्करोग : गर्भाशय, स्तन, तोंडाची पोकळी.
  • स्तनाच्या कर्करोगाची सर्वसामान्य लक्षणे :
  • स्तनांच्या आकारामध्ये बदल.
  • बोंड आत ओढलं जाणं किंवा त्याची जागा किंवा आकार बदलणे.
  • बोंडावर किंवा त्याभोवती पुरळ.
  • एक किंवा दोन्ही बोंडांमधून स्त्राव.
  • स्तनांची त्वचा खडबडीत होणे किंवा खळ्या पडणे.
  • स्तनांमध्ये गाठ किंवा जाड होणे.
  • स्तन किंवा काखेमध्ये सतत वेदना.

गर्भशयाच्या कर्करोगाची सर्वसामान्य लक्षणे

  • समागमानंतर रक्तस्त्राव.
  • दोन पाळीच्या दरम्यान रक्तस्त्राव.
  • श्वेतपदर.
  • अति प्रमाणात अंगावरुन जाणे.
  • पाेटदुखी.
  • ओटीपोटाच्या खालील भागात वेदना.

तोंडाच्या कर्करोगाची सर्वसाधारण लक्षणे

  • तोंडाच्या पोकळीमध्ये पांढरा / लाल चटृा.
  • तोंडाच्या पोकळीमध्ये व्रण / खडबडीत भाग, विशेषत: एक महिन्याहून अधिक काळ बरे झालेले नाहीत.
  • तोंडातील लाळ फिकट पडणे.
  • मसालेदार अन्न खाण्यास अवघड जाणे.
  • तोंड उघडण्यास अवघड जाणे.
  • जीभ बाहेर काढण्यास अवघड जाणे.
  • आवाजामध्ये बदल (किनरा आवाज)
  • अति प्रमाणात लाळ सुटणे.
  • चावणे / गिळणे / बोलण्यास अवघड जाणे.

महिला आरोग्य अभियाना बाबत

दिनांक 26 फेब्रुवारी ते 12 मार्च 2015 या कालावधीत अभियान अमंलबाजवणी खालील प्रमाणे करण्यात येणार आहे.
1. विविध आरोग्य कार्यक्रमांची जनजागृती करण्यासाठी रॅलीचे आयोजन, पथनाट्य, लोककला कार्यक्रम, महिला मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
2. सर्व आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयाचे ठिकाणी 30 वर्षावरील महिलांची असांसर्गीक रोगांसाठी तपासणी केली जाणार आहे.
3. ममता दिन म्हणजेच स्तनपान व शिशुपोषण याबद्दल महिलांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
4. विविध पोषणयुक्त पाककृतींची प्रात्याक्षिके घेण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील गावपातळीपासून शहरांपर्यंत जास्तीत जास्त महिलांचा सहभाग घेण्यात येणार असून किशोरवयीन मुलींसाठीही मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिक व स्वयंसेवी संस्था यांनाही अभियान यशस्वी करणेसाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

 

-जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदर्ग

माहिती स्रोत: महान्यूज, बुधवार, २५ फेब्रुवारी, २०१५.

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate