उदराच्या वरच्या भागात असलेली आणि पचनक्रियेसाठी जरूर असलेली ग्रंथी‘अग्निपिंड’ या नावाने ओळखली जाते.
अल्ब्युमीन श्वेतक हा एक चिकट, पाण्यात विरघळणारा व जिलेटीनसारखा पदार्थ आहे. अन्नघटकातील प्रथिनांचा हा एक प्रकार आहे. अंड्यात, दुधात व रक्तात अल्ब्युमीन असते. अंड्यातील पांढरा भाग म्हणजे अल्ब्युमीन होय.
अनेक गुण मुलांना आईबापांकडून मिळतात.
एक पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे आनुवंशिकता. सर्व सजीवांमध्ये – प्राणी, वनस्पती आणि जीवाणूंसारख्या सूक्ष्मजीवांमध्येही – ही प्रक्रिया घडून येते.
उत्सर्जनसंस्था म्हणजे शरीरात तयार होणारे टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणा-या संस्था.
पृष्ठवंशीय (पाठीला हाडांचा कणा असलेल्या) प्राण्यांच्या धडातील वरच्या भागाला छाती आणि खालच्या भागाला ‘उदर’ असे म्हणतात. त्यालाच ‘उदरगुहा’ किंवा ‘पर्युदरगुहा’ असेही म्हणतात.
स्तनी प्राण्यांच्या मुखद्वारापुढे आडव्या असलेल्या दोन मांसल अवयवांस ओठ म्हणतात. वरच्या व खालच्या ओठांच्या संधिस्थानाला मुखकोन किंवा तोंडाचा कोपरा असे म्हणतात.
ज्या तंतुसमूहाच्या दोरीसारख्या चकचकीत पांढऱ्या गठ्ठ्यांनी अस्थींना किंवा उपास्थींना स्नायू घट्ट बांधले जातात त्यांना कंडरा म्हणतात. स्नायू एकत्र बांधणाऱ्या पातळ, रुंद व चपट्या कंडरेला कंडराकला म्हणतात.
लहान लहान परंतु भक्कम अशा गोलाकार अस्थींचा मिळून पाठीचा कणा तयार होतो.
श्रवणाच्या इंद्रियाला कान असे म्हणतात. शरीराचा समतोल राखणे हेही अंतर्कर्णाचे कार्य आहे. याचे बाह्य, मध्य व अंतर्कर्ण असे तीन भाग सस्तन प्राण्यांत स्पष्ट दिसतात. सरीसृप (सरपटणारे प्राणी), उभयचर व पक्षी यांत मध्य व अंतर्कर्ण असे दोनच भाग दिसतात.
शरीराच्या निकामी झालेल्या अवयवांचे कार्य करून घेण्यासाठी ज्या कृत्रिम साधनांचा वापर केला जातो, त्यांना ‘कृत्रिम अवयव’ असे म्हणतात. सर्वसाधारणपणे 'कृत्रिम अवयव' या संज्ञेचा उल्लेख कृत्रिम हात व पाय यांच्या संदर्भात केला जातो.
शरीरातील एखादे इंद्रिय निकामी झाले की, त्या इंद्रियाची सामान्य कार्ये घडून येण्यासाठी ते काढून टाकून त्याऐवजी कायमस्वरूपी साधने किंवा उपकरणे शरीरात बसवितात.
कृमि : अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या), कृश, हातपायादी अवयव नसलेल्या, मृदू शरीराच्या व लांबट आकाराच्या प्राण्यांना‘कृमी’ असे म्हणतात. काही वेळा ही संज्ञा सरसकट सर्व कीटकांना स्थूल अर्थाने वापरतात.
शरीराच्या एखाद्या भागाचा मृत्यू होऊन तो सडू लागला म्हणजे त्या भागाचा ‘कोथ’ झाला असे म्हणतात. कोथ होण्याला दोन कारणे अवश्य असतात : (१) रक्तप्रवाह बंद पडणे आणि (२) जंतुसंसर्ग.
कोलेस्टेरॉल हा प्राण्यांच्या पेशींमध्ये आढळणारा एक रासायनिक घटक आहे. तो पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये जास्त प्रमाणात, मात्र वनस्पतींत अभावानेच आढळतो.
गर्भावरणाभोवती असलेल्या उल्बी द्रवाची चिकित्सा. हे एक वैद्यकीय चिकित्सा तंत्र असून यामार्फत गर्भाच्या गुणसूत्रांमधील अपसामान्यता आणि संसर्ग यांचे जन्माअगोदर निदान केले जाते.
पुरुषाकडून आणि स्त्रीकडून प्रत्येकी एक सूक्ष्म बीज (पेशी) एकत्र येऊन गर्भधारणा होते.
बहुपेशीय सजीवांच्या प्रारंभिक अवस्थेतील विकास आणि वाढ यांचा अभ्यास गर्भविज्ञान किंवा भ्रूणविज्ञान या शाखेत केला जातो. सामान्यपणे ही शाखा प्राणिशास्त्राशी संबंधित असल्याचे मानले जाते.
पुरुषाच्या शरीरातील सर्व पेशींत X Y ही लिंगसूत्रे (आणि 44 शरीरसूत्रे) असतात, तर स्त्रीशरीरात लिंगसूत्रे फक्त XX प्रकारची असतात. शरीरसूत्रांची संख्या दोन्हीकडे समान आहे.
थॉयरॉईड (गलग्रंथी) ही फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी स्वरयंत्राच्या खालच्या बाजूस असते.
बृह्दांत्राच्या (मोठ्या आतड्याच्या) शेवटच्या दोन भागांस अनुक्रमे गुदांत्र आणि गुदमार्ग असे म्हणतात. गुदमार्ग ज्या द्वाराने उघडतो त्याला गुदद्वार असे म्हणतात. प्रस्तुत नोंदीत मानवाचे गुदांत्र व गुदद्वार यांचीच माहिती दिली आहे.
पोटातील गाठीला गुल्म म्हणतात. गुल्मात वायुगोळा, स्त्रियांत होणारे रक्तगुल्म (रक्तार्बुद),प्लीहावृद्धी (पानथरीची वाढ) व आंत्रांत्रनिवेशासारखी तीव्र गाठ ह्यांचा समावेश होतो. गुल्माची कारणे, रोगलक्षणे व चिकित्सा कारणानुवर्ती आहेत.
ग्रंथि : सामान्यतः कोशिकांच्या (पेशींच्या) समूहापासून बनलेल्या, शरीरक्रियेला आवशयक असणारे स्त्राव निर्माण करण्याचे किंवा उत्सर्जनाचे (शरीराला नको असलेले पदार्थ बाहेर टाकण्याचे) कार्य करणाऱ्या शरीरातील विशिष्ट रचनांना ग्रंथी म्हणतात.
अनेक मानवी रोगांवर योग्यप्रकारे बनविलेली ग्रंथिद्रव्ये उपयुक्त ठरल्यानंतर ती भरपूर प्रमाणात उपलब्ध व्हावी म्हणून जे प्रयत्न झाले त्यांमधूनच ग्रंथिद्रव्य उत्पादनाचा उगम झाला.
अन्नमार्गाचा जो भाग नासागुहा (नाकातील पोकळी). मुख व स्वरयंत्र (कंठ) यांच्या मागच्या भागी असतो त्याला ग्रसनी म्हणतात. अन्नाशिवाय श्वसनक्रियेच्या वेळी हवा आत बाहेर पडण्याचा मार्गही ग्रसनीच्या मुख–ग्रसनी व नासा–ग्रसनी या भागांतून जातो.
ग्रसिकेची लांबी, रचना व कार्य निरनिराळ्या प्राण्यांत निरनिराळे असते. काही प्राण्यांत ती अन्न बारीक करण्याचे कार्य करते. काहींमध्ये तिच्या काही भागांत अन्न तात्पुरते साठवले जाते.
ग्रहणी : (ड्यूओडेनस). लघ्वांत्राच्या (लहान आतड्याच्या) पहिल्या भागाला 'ग्रहणी' म्हणतात. हा भाग सु. २५ सेंमी. लांब असून तो लघ्वांत्राचा सर्वांत लहान आणि सर्वांत जाड भाग आहे.
ग्रीवा : डोके आणि धड यांना जोडणाऱ्या स्तंभावर शरीरभागाला ग्रीवा अथवा मान असे म्हणतात. बहुतेक सर्व सस्तन प्राण्यांमध्ये मानेतील कशेरुकांची (मणक्यांची) संख्या सातच असते.
रोहिणीतील रक्तामधील रासायनिक बदलाने चेतवल्या जाणाऱ्या ग्रीवेतील (मानेतील) पिंडास ग्रीवा पिंड म्हणतात. सामान्य ग्रीवा रोहिणीचे द्विभाजन होऊन अंतर्ग्रीवारोहिणी व बाह्यग्रीवारोहिणी असे तिचे दोन फाटे मानेच्या मध्यावर होतात.
घर्मग्रंथि : (स्वेद ग्रंथी). घाम उत्पन्न करणाऱ्या ग्रंथींना ‘घर्म ग्रंथी’ असे म्हणतात. या ग्रंथी अंतस्त्वचेमध्ये असतात. प्रत्येक ग्रंथी एका नळीच्या वेटोळ्याची बनलेली असून ती त्वचेच्या सर्वांत आतल्या थरात असते.