অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लघवीची तपासणी

  • साखर (मधुमेह)
  • प्रथिने (मूत्रपिंडाचा आजार)
  • लघवीत रक्त (मुतखडा किंवा मूत्रसंस्थेचे इतर आजार)
  • पुवाच्या पेशी (जंतुदोष)
  • पित्तक्षार (कावीळ)
  • क्षार (मुतखडे), इ.

यातील साखर व प्रथिने यांसाठी केली जाणारी तपासणी सर्वात जास्त वापरली जाते. उतारवयातशस्त्रक्रियेआधीनिरनिराळया आजारांतमधुमेहासाठी ही प्राथमिक तपासणी उपयोगी पडते.

लघवीत साखरेची ही तपासणी अगदी सोपी आहे. यासाठी पुढील तंत्र वापरा. परीक्षानळीत पाच मि.लि. बेनेडिक्ट हे निळे औषध घेऊन उकळा व त्यात लघवीचे चार -पाच थेंब टाका. जर मूळचा निळा रंग न बदलता तसाच राहिला तर साखर नाही असा अर्थ. तो बदलला तर साखरेच्या प्रमाणाप्रमाणे हिरवापिवळातांबडातपकिरी असा होत जातो. औषधातल्या तांब्यावर साखरेची रासायनिक क्रिया झाल्यामुळे बेनेडिक्टचा रंग बदलतो.

प्रथिनांसाठीही सोपी तपासणी आहे. परीक्षानळीत चार-पाच मि.लि. लघवी उकळून त्यात 2-3 थेंब ऍसेटिक आम्ल टाका.  लघवीत धूसरपणा किंवा गढूळपणा असल्यास प्रथिने आहेत. लघवी न बदलता स्वच्छ राहिल्यास प्रथिने नाहीत. प्रथिने आढळल्यास मूत्रपिंडात किंवा मूत्रसंस्थेत काही बिघाड आहे असा निष्कर्ष निघतो.

काविळीत लघवी जास्त गडद पिवळी होते. कारण त्यात बिलीरुबीन नावाचे द्रव्य उतरते. काविळीची लघवी काचेच्या परीक्षानळीत घालून जोराने हलवल्यास त्यावर पिवळा फेस येतो. पण हे ही लक्षात ठेवा की फ्युराडीन किंवा 'जीवनसत्त्वाच्या गोळया घेतल्यास लघवी पिवळी होते. लघवीत रक्त आढळल्यास मूत्रसंस्थेत किंवा रक्तसंस्थेत गंभीर दोष संभवतो.

लघवी तपासणीसाठी डिपस्टिक पध्दत

लघवीतील निरनिराळया रासायनिक तपासण्यांसाठी रासायनिक काडया (प्लॅस्टिक कागदाच्या पट्टया) उपलब्ध आहेत. लघवीत ही काडी बुडवून त्यावरच्या रंगबदलावरून ग्लुकोजप्रथिनेबिलीरुबीन व आणखी काही पदार्थ आहेत की नाहीत हे कळते. या काडया सहज वापरता येतात. एका बाटलीत साधारणपणे 50 काडया असतात.

या काडया कात्रीने उभ्या कापून एकाच्या दोन करून वापरता येतात. एकदा बाटली उघडल्यावर तीन महिन्यांनंतर त्या निकामी होतात. यासाठी पाच-दहा काडयांची पाकिटे निघाली तर चांगला उपयोग होऊ शकेल. काडी काढून घेतल्यावर बाटलीला लगेच बूच बसवण्यास विसरू नका. हवेतील ओलेपणामुळे काडया लवकर खराब होतात.


लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

अंतिम सुधारित : 6/6/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate