অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रोगनिदान व तपासणी

रोगनिदान व तपासणी

  • अंगग्रहरोधके
  • अरेखित इच्छेनुसार ज्यांची हालचाल होत नाही अशा स्नायूंचा (उदा., हृदय, आतडे यांच्या स्नायूंचा) ताण कमी करणाऱ्या औषधी द्रव्यांना अंगग्रहरोधके असे म्हणतात. ज्या कारणांमुळे स्नायूंवर ताण येतो त्या कारणांवर औषधांचा परिणाम होईलच असे नाही.

  • अ‍ॅलोपॅथी (Allopathy)
  • निरनिराळ्या समाजांत व संस्कृतींत अनेक पद्धती विकसित होत आल्या व त्यातील अनेक लोपही पावल्या. परंतु, पूर्ण शास्त्र म्हणून विकसित झालेल्या व आजही प्रचारात असणार्‍या काही पद्धती म्हणजे युनानी उपचार पद्धती, आयुर्वेद, समउपचारपद्धती (होमीओपॅथी) व विषम/विरुद्ध उपचारपद्धती (अ‍ॅलोपॅथी).

  • आजारांची कारणपरंपरा
  • आपण खोल आणि व्यापक विचार केला तर आजारांची कारणे तीन पातळयांवर आहेत असे दिसते

  • आजारांचे वर्गीकरण
  • रोगविकृतीशास्त्राप्रमाणे अनेक कारणांमुळे आजार होतात असे दिसते.

  • आरोग्यभुवन
  • आरोग्यभुवन : (चिकित्साधाम, सॅनिटेरियम). चिरकारी (दीर्घकालिक) मानसिक अथवा शारीरिक रुग्णांची आणि रोगांतून नुकतेच बरे झालेल्यांच्या स्वास्थ्यसंवर्धनाची व्यवस्था असलेल्या संस्थेला आरोग्यभुवन असे म्हणतात.

  • इन्शुलीन (Insulin )
  • शरीरातील शर्करेच्या आणि इतर पोषकद्रव्यांच्या वापरावर नियमन राखणारे एक संप्रेरक. हे संप्रेरक कमी पडल्यास मधुमेह हा विकार होतो. स्वादुपिंड ही ग्रंथी जठर आणि आद्यांत्र यांच्याजवळ असते. स्वादुपिंडामध्ये लांगरहान्स द्वीपके नावाचे पेशीसमूह असतात.

  • ऊतकतापन चिकित्सा
  • ऊतकतापन चिकित्सा : (डायाथर्मी). उच्च कंप्रतेच्या (दर सेकंदाला होणार्‍या कंपन संख्येच्या) विद्युत् प्रवाहाने शरीरातील ऊतकांमध्ये (समान रचना व कार्य असलेल्या पेशीसमूहांमध्ये) उष्णता उत्पन्न करण्याच्या क्रियेचा उपयोग ज्या चिकित्सेत करण्यात येतो तिला ऊतकतापन चिकित्सा म्हणतात.

  • औषधे (Drugs)
  • मनुष्य किंवा प्राणी यांच्या रोगांचे निदान करण्यासाठी, रोगांना प्रतिबंध करण्यासाठी किंवा रोगांवर उपचारासाठी वापरण्यात येणारे पदार्थ. वैद्यकीय व्यवसायातील हे एक महत्त्वाचे संसाधन आहे.

  • क्ष-किरण तपासणी (एक्स-रे)
  • क्ष-किरण (एक्स-रे) हे डोळयांना न दिसणारे किरण असतात. या किरणांना वस्तू भेदून जाण्याची क्षमता असते

  • चिकित्सा -आरोग्यसेवांची
  • महाराष्ट्रातल्या आरोग्यसेवांचे शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण. आरोग्यसेवा सुधारणांसाठी एक कालबद्ध कार्यक्रम.

  • चिकित्साशास्त्र
  • रोग म्हणजे काय याची कल्पना जसजशी सुस्पष्ट, तर्कशुद्ध आणि प्रयोगसिद्ध होऊ लागली तसतसे चिकित्साशास्त्रातील प्रक्रियांमध्येही बदल होत जाणे साहजिकच होते.

  • जीवोतक परीक्षा
  • जीवोतक परीक्षा : (बायोप्सी). जिवंत शरीरातून घेतलेल्या ऊतकांची (समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहांची) रोगनिदानाकरिता स्थूलमानाने व सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने केलेल्या तपासणीस जीवोतक परीक्षा म्हणतात.

  • ज्वरशामके
  • ज्वरशामके : (अँटिपायरेटिक्स). जी औषधे दिली असता शरीराचे वाढलेले तापमान पुन्हा प्राकृत (नेहमीच्या) पातळीवर येते, अशा औषधिद्रव्यांस ज्वरशामके म्हणतात.

  • तुंबडी लावणे
  • शरीरातील इंद्रियांच्या विकारांवरील एका चिकित्सेला ‘तुंबडी लावणे’ म्हणतात. ज्या विकारांमध्ये शोथ (दाहयुक्त सूज) किंवा रक्त एकाच ठिकाणी गोळा होण्याची क्रिया प्रामुख्याने आढळते, त्याच विकारांकरिता ही चिकित्सा पद्धती एके काळी वापरात होती.

  • दंतवैद्यक
  • दात व तत्संबंधी तोंडातील भाग, ह्यांचे रोग व त्यावरील प्रतिबंधात्मक व चिकित्सात्मक इलाज, नैसर्गिक दात वाकडेतिकडे असल्यास ते व्यवस्थित करणे, त्याचप्रमाणे नैसर्गिक दात पडल्यास त्या जागी कृत्रिम दात बसविणे इत्यादींचा समावेश दंतवैद्यकात होतो.

  • दम लागणे
  • शरीराच्या गरजेइतका प्राणवायू मिळत नसला तर श्वसनसंस्था व हृदय जास्त काम करून प्राणवायू पुरवण्याची धडपड करतात. यालाच आपण 'दम लागणे' म्हणतो

  • दुर्बिण तपासणी - एंडोस्कोपी
  • काही आजारात जठर, उदर, श्वासनळया, इत्यादी पोकळयांची व त्यांच्या 'भिंतींची'स्थिती कशी आहे हे जाणून घ्यायची गरज असते.

  • पायावर सूज
  • पायावर सूज हे तसे क्वचित आढळणारे लक्षण आहे.

  • पेशीसमूहांची तपासणी
  • काही वेळा शरीरातून शस्त्रक्रियेने काही भाग बाहेर काढला जातो.

  • बेडक्याची तपासणी
  • ही तपासणी मुख्यत: क्षयरोगासाठी करतात.

  • भौतिकी चिकित्सा
  • इजा झालेल्या किंवा आजारी भागांस ते पूर्ववत होऊन कार्यक्षम होण्यासाठी ज्या चिकित्सेमध्ये उष्णता, विद्युत्, जल इ. भौतिकीय साधानांचा उपयोग केला जातो तिला ‘भौतिकी चिकित्सा’ म्हणतात.

  • भ्रूणविज्ञान
  • भ्रूणाच्या विकासातील प्राथमिक अवस्थांचा अभ्यास या विज्ञानाच्या कक्षेत येतो. या क्रियेची सुरुवात एका जटिल (गुंतागुंतीची रचना असलेल्या) कोशिकेपासून (पेशीपासून) होते, या कोशिकेस अंडे म्हणतात.

  • मर्दन चिकित्सा
  • हातांच्या उपयोगाने किंवा विशिष्ट उपकरणे वापरून शरीरातील ऊतकांची (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या−पेशींच्या−समूहांची) योग्य हालचाल करून ज्या चिकित्सेत रोगोपचार करतात तिला ‘मर्दन चिकित्सा’ म्हणतात.

  • युनानी वैद्यक
  • ॲलोपॅथी अथवा विषम चिकित्सा, होमिओपॅथी अथवा समचिकित्सा किंवा आयुर्वेदिक चिकित्सा याप्रमाणेच एका चिकित्सेला ‘युनानी वैद्यक’ अथवा ‘युनानी चिकित्सा’ म्हणतात.

  • योग चिकित्सा
  • रोग चिकित्सेमध्ये योगोपचार वापरले जातात तिला ‘योगचिकित्सा’ म्हणतात. आयुर्वेद, होमिओपॅथी किंवा ॲलोपॅथी ही जशी वैद्यकीय शास्त्रे असून, रोगोपचार हा त्यांचा प्रमुख उद्देश आहे,तसा योगशास्त्राचा चिकित्सा हा प्रमुख हेतू नाही, हे निर्विवाद आहे.

  • रक्त तपासणी
  • रक्ततपासणी हा शब्द आपण ब-याच वेळा ऐकला असेल. हल्ली रक्ततपासणी शिवाय उपचार केले जात नाहीत. (मात्र प्रत्येक रुग्णाच्या बाबतीत रक्ततपासणीची गरज नसते.)

  • रक्तगट
  • रक्ताचे चार प्रमुख गट आहेत. (ए, बी, एबी आणि ओ) हे गट रक्तात असलेल्या विशिष्ट घटकांप्रमाणे केलेले आहेत.

  • रक्तपेढी
  • ज्या ठिकाणी बहुधा मोठ्या रुग्णालयाच्या खास विभागात रक्तदात्याकडून गोळा केलेले रक्त त्यावर योग्य प्रक्रिया करून विशिष्ट रीतीने साठवले जाते आणि आवश्यक तेव्हा रुग्णाकरिता पुरवले जाते, त्याला ‘रक्तपेढी’ म्हणतात.

  • रक्तरसविज्ञान
  • ज्या शास्त्रात रक्तरसाचा, विशेषेकरून ⇨रोगप्रतिकारक्षमतेसंबंधी व प्रयोगशालीय विश्लेषणावर अधिक भरदेऊन अभ्यास केला जातो त्या शास्त्राला ‘रक्तरसविज्ञान’ म्हणतात.

  • रक्ताधान
  • एका प्राण्याचे रक्त काढून ते दुसऱ्या प्राण्याच्या रक्ताभिसरणात मिसळण्याच्या क्रियेला ‘रक्ताधान’ म्हणतात.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate