অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जन्मजात हृदयदोष

जन्मजात हृदयदोष


  • जन्मजात हृदयदोष जन्माच्या वेळीच्या हृदयातील दोषांमुळे होतात.
  • जन्मजात हृदयदोष हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात जे सामान्य किंवा अवघड असू शकतात.

संकेत आणि लक्षणे

  • ब-याच जन्मजात हृदयदोषांमध्ये लक्षणे नसतात.
  • गंभीर लक्षणे नवजात बालकांमध्ये दिसून येतात. ज्यात जोरजोरात श्वास घेणे , त्वचेवर, ओठांवर, बोटांच्या टोकांवर वा नखांवर निळ्या रंगाची छटा असणे आणि रक्त पुरवठा कमी असणे अशा प्रकारच्या लक्षणांचा समावेश असतो.
  • जरा मोठ्या मुलांमध्ये काहीही काम करताना श्वास घेण्यास त्रास होणे वा लवकर थकणे ही लक्षणे पहायला मिळतात.
  • हृदयदोषांमध्ये दिसणा-या लक्षणांमध्ये लवकर थकणे, श्वास घेण्यास त्रास होणे, फुफ्फुसात रक्त व पाणी भरणे आणि पायात, पाऊलात किंवा घोट्यात पाणी होणे याचा समावेश होतो.
  • गंभीर स्वरुपाचा हृदयदोष मुल आईच्या पोटात असतांना किंवा बाळाच्या जन्मानंतर लगेचच जाणून घेता येऊ शकतो. काही लक्षणे मात्र लहानपणी व मोठेपणीदेखील दिसत नाहीत.

 

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम

अंतिम सुधारित : 8/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate